40 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या बी-ग्रेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली होती 100 पट अधिक कमाई. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
बॉलिवूड चित्रपटसृष्टीत अनेक भयपट चित्रपट आहेत. ज्यामध्ये काही चित्रपटांचे बजेट हे फारच कमी आहे. तर काही चित्रपट मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आले आहेत.
ज्यामध्ये रॅमसे ब्रदर्सनी 80 आणि 90 च्या दशकात अनेक हॉरर चित्रपट बनवले. या चित्रपटाचे बजेट देखील फार कमी होते. तरीही ते बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.
1984 मध्ये 'पुराना मंदिर' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटत सर्वात यशस्वी बी-ग्रेड हॉरर चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने बजेटच्या 100 पट अधिक कमाई केली होती.
या चित्रपटाची निर्मिती तुलसी रामसे आणि श्याम रामसे यांच्या दिग्दर्शनाखाली करण्यात आला होता. या चित्रपटाचे बजेट अडीच लाख रुपये होते. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अडीच कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाची कथा एका जुन्या हवेलीभोवती फिरते. या हवेलीमध्ये एक भयानक राक्षस शंभर वर्षांपासून बंदिस्त असते.
या चित्रपटात मोहनीस बहल, अनिरुद्ध अग्रवाल, पुनित इस्सर आणि आरती गुप्ता हे कलाकार होते. या चित्रपटातील सीन खूपच भयानक आणि मनोरंजक आहेत.
हा चित्रपट 80 च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा हॉरर चित्रपट होता. या चित्रपटाने कमी बजेटमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई केली होती.