R Madhavan buys new apartment in BKC : प्रसिद्ध अभिनेता आर माधवन याने नुकताच मुंबईत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. त्याची किंमत किती असेल? तुम्ही फक्त अंदाज लावा
बॉलीवूड ते साऊथ सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत एक नाव येतं, ते म्हणजे आर माधवन...! हाच मॅडी आता मुंबईकर झाला आहे.
'शैतान' चित्रपटमधील त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि त्यानंतरच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे आर माधवनचं कौतूक होताना दिसतंय.
अशातच बीकेसीमध्ये आर माधवनने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. बीकेसीतील Signia Pearl या इमारतीत त्याने घर घेतल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे.
माधवनने घेतलेल्या या फ्लॅटची किंमत तब्बल 17.5 कोटी आहे. अनेक उच्चभ्रू लोक याच ठिकाणी राहतात. त्यामुळे माधवनला मोठी किंमत मोजावी लागली.
दरम्यान, 22 जुलै रोजी आर माधवनची ही डील फायनल झाली होती. यासाठी मॅडीने 1.05 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी देखील भरली आहे.