12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. दोघांचा लग्नानंतरचा पहिलाच गणपती उत्सव आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचे गणपती उत्सवाचे फोटो व्हायरल होत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबानी कुटुंबात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे.
अंबानी कुटुंबाच्या सेलिब्रेशनमध्ये सलमान खान, रेखा, श्रद्धा कपूर आणि करीना कपूर यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते.
गणपती पूजेच्या वेळी नीता अंबानी चमकदार जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या.
अनंत-राधिकाची लग्नानंतरची ही पहिलीच गणपती पूजा आहे. यावेळी दोघेही गणपती पूजेदरम्यान पोज देताना दिसले.
नीता अंबानी आपली धाकटी सून राधिकाला प्रत्येक पावलावर पकडताना दिसल्या. राधिकाचा हात पकडून तिला कॅमेऱ्यासमोर आणले आणि आपल्या सुनेसोबत पोज दिली.
दरम्यान, यावेळी अनंत तिथे आल्यावर नीता अंबानी आपल्या मुलाला आणि सुनेला एकत्र पोज देण्यास सांगतात. पण अनंतने आईशिवाय पोज देण्यास नकार दिला.