PHOTOS

एक दोन नव्हे तब्बल 8 चित्रपट ऑस्करला पाठवणारा अभिनेता, ओळखलं का?

कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. पण तुम्हाला माहितीये का पंचायत वेबसीरिजमधील एका अभिनेत्याच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड आहे.

Advertisement
1/9

2/9
8 चित्रपट ऑस्करसाठी नामांकित
 8 चित्रपट ऑस्करसाठी नामांकित

पंचायत ही वेबसीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. या वेबसीरिजमध्ये प्रधान हे पात्र हिट झालं आहे. हे पात्र अभिनेता रघुबीर यादवने साकारले आहे. रघुबीर यादवला या वेबसीरिजमुळे घराघरात ओळख मिळाली. तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. रघुबीर यादवचा जन्म 25 जून 1957 रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर या ठिकाणी झाला. रघुबीर यादवचे तब्बल एक, दोन नव्हे तर तब्बल 8 चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाले.

3/9
सलाम बॉम्बे (1985)
सलाम बॉम्बे (1985)

1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सलाम बॉम्बे' चित्रपटात रघुबीर यादवने ड्रग ॲडिक्टची भूमिका केली होती. या चित्रपटाला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेसाठी नामांकन मिळाले होते. तसेच या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट 1000 मूव्हीज एव्हर मेड यातही जागा मिळवली होती. 

4/9
बँडिट क्वीन (1994)
 बँडिट क्वीन (1994)

या चित्रपटात प्रसिद्ध डाकू फूलन देवी यांची कथा सांगण्यात आली होती. शेखर कपूर दिग्दर्शित या चित्रपटात रघुबीरने माधोची भूमिका साकारली होती. 

5/9
1947 अर्थ (1998)
1947 अर्थ (1998)

दीपा मेहता दिग्दर्शित हा चित्रपट बाप्सी सिधवा यांच्या क्रॅकिंग इंडिया या कादंबरीवर आधारित होता. भारताकडून या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते. 

6/9
आय वॉटर (2005)
आय वॉटर (2005)

दीपा मेहता दिग्दर्शित हा चित्रपट वाराणसीतील विधवा स्त्रियांवर आधारित होता. यात रघुबीरने एका ट्रान्सजेंडर असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती.  

7/9
लगान (2001)
लगान (2001)

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित हा चित्रपट क्रिकेट खेळावर आधारित होता. या चित्रपटातील प्रमुख भूमिका आमिर खानने साकारली होती. तर रघुबीर हा यात एका शेतकऱ्याच्या भूमिकेत झळकला होता. 

8/9
पीपली लाइव्ह (2010)
पीपली लाइव्ह (2010)

हा चित्रपट भारतातील शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर आणि पत्रकारितेवर आधारित होता. यात त्याने एका दारु पिणाऱ्या शेतकऱ्याची भूमिका साकारली होती.  

9/9
न्यूटन (2017)
न्यूटन (2017)

2017 मध्ये प्रदर्शित झालेला न्यूटन हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित वी मसुरकरने केले होते. यात राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अंजली यादव आणि रघुबीर यादव हे कलाकार झळकले होते.

Read More