PHOTOS

IND vs ENG : विराटवर कॅप्टन रोहित मेहरबान, पण कोच राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं, 'रिक्स घेऊन खेळाल तर...'

Rahul Dravid on Virat Kohli : टीम इंडियाचा किंग म्हणजेच विराट कोहली याला सुर गवसेना झालाय. त्यावर आता राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Advertisement
1/7
विराट कोहली
विराट कोहली

विराट कोहली याला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता कोहलीवर टीका होताना दिसते. अशातच रोहित शर्माने विराटची पाठराखण केलीये.

2/7
केवळ 75 धावा
केवळ 75 धावा

विराट कोहलीला वर्ल्ड कपमधील 7 सामन्यामध्ये केवळ 75 धावा करता आल्या आहेत. त्यावर आता हेड कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.

3/7
गडबड होऊ शकते
गडबड होऊ शकते

तुम्हाला विराट माहिती आहे. तो काय करु शकतो, हे सर्वांना माहिती आहे. कधी तुम्ही रिस्क घेऊन खेळायला जाता, तेव्हा अशी गडबड होऊ शकते, असं राहुल द्रविड म्हणाले.

 

4/7
टेम्पो सेट
टेम्पो सेट

आज देखील तुम्ही पाहिलं तर विराटने सिक्स मारून एक चांगला टेम्पो सेट केला होता. मात्र, नंतरच्या बॉलवर तो अनलकी ठरला, असं म्हणत द्रविडने विराटची पाठराखण केली.

5/7
चांगलं उदाहरण
 चांगलं उदाहरण

विराट ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो, ते नक्कीच मला आवडतं. तो संघासाठी एक चांगलं उदाहरण सेट करण्याचा प्रयत्न करतोय, असंही विराटने म्हटलं आहे.

6/7
मोठी खेळी खेळणार
मोठी खेळी खेळणार

मला वाटतं की त्याच्या बॅटमधून लवकरच मोठी खेळी होणार आहे. मला त्याच्या खेळण्याचा अंदाज आवडला, असंही हेड कोच द्रविड म्हणतात.

7/7
तो डिजर्व करतो..
तो डिजर्व करतो..

मैदानावर त्याचा जो तोरा असतो, त्यामुळे नक्कीच संघाला स्पृर्ती मिळते. आणि तो डिजर्व करतो, असंही राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.





Read More