PHOTOS

पाहा दिल्लीतील बहुचर्चित डिनर पार्टीतील INSIDE PHOTOS; कोणी म्हणे 'ही' भाजपचं टेंशन वाढवणारी भेट

Rahul Gandhi dinner Meet india alliance INSIDE PHOTOS : संसदेमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कैक मुद्यांवरून खडाजंगी सुरू असतानाच या राजकीय वर्तुळातून आणि प्रामुख्यानं थेट दिल्लीहून काही असे फोटो समोर आले, ज्यांनी सर्वांचच लक्ष वेधलं.

Advertisement
1/8
भेटीगाठी
भेटीगाठी

Rahul Gandhi dinner Meet india alliance INSIDE PHOTOS :  असं म्हणतात की काही भेटी या अतिशय खास असतात. दिल्ली दरबारी अशाच एका खास कार्यक्रमाचं आयोजन राहुल गांधी यांच्या निवासस्थानी करण्यात आलं होतं. जिथं इंडिया आघाडीतील जवळपास 25 पक्षांच्या नेत्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा हजेरी लावली. निमित्त होतं ते म्हणजे राहुल गांधी यांच्या निवास्थानी आयोजित करण्यात आलेली डिनर पार्टी. 

2/8
सोनिया गांधी
सोनिया गांधी

राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या डिनर पार्टीवेळी सोनिया गांधींचासुद्धा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. 

 

3/8
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे, कन्निमोळी यांचीसुद्धा या कार्यक्रमाला हजेरी होती. 

4/8
5/8
लिडींग लेडीज
लिडींग लेडीज

प्रियंका गांधी यांनी राजकीय वर्तुळातील या 'लिडींग लेडीज' सोबत काही क्षण व्यतीत केले. अर्थात ही दृश्य पाहता त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्याचं पाहायला मिळालं. 

 

6/8
मल्लिकार्जुन खरगे
मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीसुद्धा या विशेष कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. ज्यावेळी खुद्द सोनिया गांधी यांनीसुद्धा त्यांची भेट घेतली. 

7/8
शरद पवार
शरद पवार

खुद्द शरद पवारही या कार्यक्रमासाठी हजर राहिले, जिथं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांचं स्वागत केलं. 

8/8
राजकारणापलिकडचे क्षण...
राजकारणापलिकडचे क्षण...

नेतेमंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भेटीचे काही क्षण खऱ्या अर्थानं राजकारणापलिकडचे होते. पण, काहींनी मात्र हे फोटो पाहून भाजपला धडकी भरेल असा कयास लावणारी वक्तव्यसुद्धा केल्याचं पाहायला मिळालं. 





Read More