छत्रपती शिवरायांच्या 391 व्या जयंतीनिमित्त राजधानी किल्ले रायगड पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजाळून निघाला.
अनेक दिवस अंधारात असणार्या वास्तू प्रकाशमान झाल्या. राजसदरसह रायगडवरील विविध वास्तूंना रंगीबेरंगी रोषणाईने वेगळी झळाळी मिळाली.
रायगडवर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. ज्याला पुरातत्त्व विभागाने तातडीने मंजुरी दिली.
बुधवारी रायगडवर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रायगड प्रकाशमान झाला. यापुढे किल्ले रायगड अंधारात राहणार नाही, असे वचन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.
छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर, होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा आणि समाधी स्थळाला रोज पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.
समाधी स्थळाला रोज पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प उद्या शिवजयंतीच्या माध्यमातून सुरू होणार आहे.
किल्ले रायगड विद्युत रोषणाईने शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.