PHOTOS

रेल्वे प्रवासात अडचण आलीय? 'या' ॲपवर करा तक्रार, काही मिनिटांतच होईल निराकरण

 रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी 'रेल मदद ॲप' लाँच केले आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवासी आता मोबाईल किंवा वेब प्लॅटफॉर्मवरून प्रवास करताना सहजपणे तक्रारी नोंदवू शकतात. 

Advertisement
1/9

RailMadad App:भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे. दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात.  रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते.

2/9
प्रवेशांना अडचणींचा सामना
प्रवेशांना अडचणींचा सामना

असे असतानादेखील प्रवासादरम्यान प्रवेशांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. भारतीय रेल्वेकडे अनेक प्रकारे तुम्ही तक्रार करु शकता. 

3/9
तत्काळ तक्रार
तत्काळ तक्रार

भारतीय रेल्वेने RailMadad ॲप लाँच केले आहे. याद्वारे प्रवाशांना तत्काळ तक्रारी नोंदवता येते. विशेष म्हणजे रेल्वे देखील यावर त्वरीत निराकरण करते. या ॲपवर प्रवासी तक्रारींसह सूचनाही देऊ शकतात.

4/9
रेल मदद ॲप
रेल मदद ॲप

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी 'रेल मदद ॲप' लाँच केले आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवासी आता मोबाईल किंवा वेब प्लॅटफॉर्मवरून प्रवास करताना सहजपणे तक्रारी नोंदवू शकतात. 

5/9
रेल्वे कर्मचारी मदतीला
 रेल्वे कर्मचारी मदतीला

तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि सीट किंवा कोच अस्वच्छ असेल तर तुम्ही त्याबद्दल येथे तक्रार देखील करू शकता. यानंतर रेल्वे कर्मचारी तुमची समस्या सोडवतात आणि तुमच्याकडून फीडबॅकही घेतला जातो.

6/9
कोणत्या सुविधा?
कोणत्या सुविधा?

या ॲपवर वैद्यकीय आणि सुरक्षा सहाय्य उपलब्ध आहे. अपंग आणि महिलांसाठी येथे विशेष सुविधा उपलब्ध आहेत. ट्रेनमधील कोणत्याही समस्येबद्दल तुम्ही तक्रार करू शकता. ट्रेन किंवा रेल्वे स्टेशनशी संबंधित कोणतीही तक्रार नोंदवता येईल.

7/9
तक्रार कशी करायची?
तक्रार कशी करायची?

फोनमध्ये RailMadad ॲप इन्स्टॉल करा. यानंतर नाव आणि मोबाईल नंबर टाका आणि OTP च्या मदतीने लॉग इन करा. तक्रार नोंदवण्यासाठी तुमचा पीएनआर क्रमांक टाका.

8/9
तक्रारीसह फोटो अपलोड
तक्रारीसह फोटो अपलोड

आता स्क्रीनवर तक्रारींची लिस्ट दिसेल. येथे तुम्ही तक्रार करू शकता.या पेजवर जाऊन तुमच्या तक्रारीसह फोटो अपलोड करा. 

9/9
सुविधा सर्वांसाठी
सुविधा सर्वांसाठी

या ॲपवर रेल्वेला रिअल टाईम तक्रारी मिळतील. येथे तुम्ही तुमच्या तक्रारीचा मागोवा देखील घेऊ शकता. ही सुविधा सर्वांसाठी आहे. या ॲपच्या मदतीने जनरल डब्यातून प्रवास करणारे प्रवासीही तक्रार करू शकतात.





Read More