देवेंद्र कोल्हटकर : कृष्णकुंज वरून राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी शिवतीर्थावर आज गृहप्रवेश केला आहे. राज ठाकरे यांनी अत्यंत जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या साक्षीने गृहप्रवेश केला.
राज ठाकरे हे स्वतः कलावंत असल्यामुळे त्यांनी आपल्या अनोख्या स्टाईलने हे शिवतीर्थ सजविले आहे. ज्याचे दर्शनच शिवाजी महाराजाना समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला पत्राद्वारे होतो. ही अप्रतिम पत्र कलाकृती श्री अनुप चिटणीस यांनी तयार केलेली आहे.
पाचव्या मजल्यावर वॉल्ट डिजनी यांच्या कलाकृतींचा संग्रह आहे आणि समोर भव्य दिव्य टेरेस.
समोर एक पेंटिंग आहे ज्यात श्री प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांची रेखाटने आहेत. जी श्री विजय राऊत यांनी कॅनव्हासवर तयार केलेली कलाकृती आहे.
एक बाजूला शिवाजी महाराजांचे एक भव्य ऑइल कलर मधले पेंटिंग आहे. जे श्री वासुदेव कामत याचे ऑइल पेंटिंग आहे. तर दुसऱ्या बाजूला 1945 व 2021 सालातले शिवाजीपार्क आहे.
राज ठाकरे यांच्या स्वप्नातील हा एक यूरोपीय प्रभाव असलेला भव्य दिव्य शिवतीर्थ नावाचा राजवाडा आहे.