PHOTOS

Priya Singh Body Builder : दोन मुलांची आई ते साडीतून बिकनीपर्यंतचा प्रवास... आता आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर

Rajsthan First Women Bodybuilder Priya Singh:: थायलंडच्या (Thailand) पटाया इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये (International Bodybuilding Championship) भारताने  दमदार कामगिरी केली. राजस्थानच्या (Rajasthan) प्रिया सिंहने (Priya Singh) या स्पर्धेत गोल्ड मेडलची (Gold Medal) कमाई करत आंतरराष्ट्रीय पातळीवर तिरंगा फडकावला. विशेष म्हणजे प्रिया सिंहने 2018 ते 2020 अशी सलग तीन वर्ष 'मीस राजस्थान'चा खिताबही जिंकला आहे. 

Advertisement
1/6

प्रिया सिंह राजस्थानच्या बिकानेरमध्ये राहणारी आहे. प्रियाचं कुटुंब तसं पुरातन विचारांचं असल्याने वयाच्या आठव्याच वर्षी प्रियाचं लग्न लावून देण्यात आलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने वयात आल्यावर प्रियाने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. 

2/6

प्रियाचं व्यक्तीमत्व चांगलं असल्याने तिला एका जिममध्ये नोकरी मिळाली. जिममध्ये येणाऱ्या लोकांना व्यायाम करताना बघूनही प्रियाही प्रेरित झाली. यानंतर तीने स्वत: व्यायाम सुरु केला. कठोर मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर काही महिन्यातच प्रियाने पिळदार शरीर कमावलं.

3/6

या दरम्यान तिला बॉडि बॉल्डिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याची माहिती मिळाली. पण त्यावेळी राजस्थानमधून एकाही महिला बॉडिबिल्डरची या स्पर्धेत निवड होऊ शकली नाही. त्याचवेळी प्रिया सिंहने या स्पर्धेत खेळण्याचा मनाशी निश्चय केला. व्यायामाबरोबरच डाएटवर लक्ष केंद्रीत करत प्रियाने जीवतोड मेहनत केली. 

4/6

प्रियाच्या मेहनतीला अखेर यश मिळालं. थायलंडच्या पटाया इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रियाने गोल्ड मेडल पटकावत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उज्ज्वल केलं.

5/6

आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल विजेती प्रियाला दोन मुलं आहेत. आपलं कुटुंब आणि व्यायाम याची योग्य सांगड घालत प्रियाने हे यश मिळवलं आहे. 

6/6
Rajasthan First Women Bodybuilder priya singh win gold medal in thailand international bodybuilding Championship
Rajasthan First Women Bodybuilder priya singh win gold medal in thailand international bodybuilding Championship

प्रिया सिंहचं सोशल मीडियावर अकाऊंट असून त्यामध्ये तिने लिहिलंय साडीतून बिकनीपर्यंतचा प्रवास. प्रिया सिंहचे इन्स्टाग्रामवर तब्बल 33 हजार फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.





Read More