Princess Gauravi Kumari of Jaipur : राजस्थानात तुलनेनं अशा अनेक कुटुंबांचे वारसदार आजही ही परंपरा पुढे नेताना दिसत आहेत.
भारतात राजघराण्यांचा शासनकाळ सरकारी निर्णयानंतर संपुष्ठात आला असला तरीही ही संस्थानं आणि त्यांना मिळणारा मानसन्मान आजही अबाधित आहे. अशाच संस्थानांपैकी एक म्हणजे जयपुरचं शाही कुटुंब. राजकुमारी दिया कुमारी आणि त्यांचं हे कुटुंब वारसा हक्क पुढे नेताना दिसत आहे.
( Jaipur City Palace) जयपूर सिटी पॅलेस हा याच कुटुंबाच्या वारसा हक्कात मिळालेल्या वास्तूंपैकी एक असून, आता तिथं हेरिटेज हॉटेलपासून संग्रहालयापर्यंतचे अनुभव घेता येतात. अशा या शाही कुटुंबातील राजकुमारी गौरवी कुमारी यांच्या सौंदर्याची चर्चाही तिथं होतच असते. या राजकुमारी इतक्या सुंदर आहेत की बी टाऊनच्या अभिनेत्रींसमवेत अंबानींच्या लेकीसुनांनाही मागे टाकतील.
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांची कन्या राजकुमारी गौरवी कुमारी त्यांच्या पारंपरिक वेशासोबतच पाश्चिमात्य लूकमध्येही तितक्याच सुंदर दिसतात. जयपूरचे महाराजा सवाई मानसिंह आणि त्यांची पहिली पत्नी मरुधर कंवर यांचे सुपुत्र भवानी सिंह आणि त्यांची पत्नी पद्मिनी देवी यांची एकुलती एक मुलगी म्हणजे राजकुमारी दिया कुमारी आणि त्यांचीच लेक म्हणजे राजकुमारी गौरवी कुमारी.
2011 मध्ये महाराज भवानी सिंह यांच्या निधनानंतर पद्मनाभ यांचा राज्यभिषेक झाला आणि त्यांची धाकटी कन्या गौरवी प्रकाशझोतात आली.
गौरवी कुमारी यांनी अमेरिकेतून शिक्षण पूर्ण केलं असून, त्यांच्याकडे मीडिया अँड कम्यूनिकेशनची पदवी आहे. आलिशान जीवनशैली असणारी गौरवी आईप्रमाणंच समाजकार्यातही पुढाकार घेतात. अनेक धर्मदाय संस्थांचं काम त्या सांभाळतात.
फॅशन क्षेत्राशी राजकुमारी गौरवी कुमारी सक्रिय असून, त्यांनी अनेक फॅशन शो मध्ये मॉडेलिंग केलं आहे.
जिम्मू चू या प्रसिद्ध ब्रँडच्या त्या ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. तब्बल ₹20000 कोटींची श्रीमंती असणाऱ्या गौरवी कुमारी यांचं रुप आणि त्यांचं कार्य हीसुद्धा त्यांची एक ओळख आहे.