PHOTOS

'माझ्या स्टुडिओला ये', राजेश्वरी खरातला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; तो प्रसिद्ध दिग्दर्शक कोण?

कशाप्रकारे एका दिग्दर्शकाने राजेश्वरीला बोलावलं आणि कास्टिंग काऊचचा प्रयत्न झाला, यातून ती कशी बाहेर पडली? याबद्दल जाणून घेऊया. ...
Advertisement
1/9
'माझ्या स्टुडिओला ये', राजेश्वरी खरातला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; तो दिग्दर्शक कोण?
'माझ्या स्टुडिओला ये', राजेश्वरी खरातला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; तो दिग्दर्शक कोण?

नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी पसंतीची पावती दर्शवली होती. याच सिनेमातून शालू म्हणजेच राजेश्वरी खरातने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. शालूच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं.यात तिने एकही डायलॉग म्हटलेला नसला तरी ती चित्रपटात चांगलीच भाव खाऊन गेली होती.

2/9
वेगळ्या कारणामुळे चर्चेत
वेगळ्या कारणामुळे चर्चेत

जब्याला काळी चिमणी गावली का? असे अनेक मिम्स तिच्या फोटोसोबत शेअर केले जात असतात. राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती आपले सुंदर फोटो शेअर करत असते. यावर तिचे चाहते लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पाडतात. राजेश्वरी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

3/9
कास्टिंग काऊचचा अनुभव
कास्टिंग काऊचचा अनुभव

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत राजेश्वरी खरातने आपल्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केलाय. कशाप्रकारे एका दिग्दर्शकाने तिला बोलावलं आणि कास्टिंग काऊचचा प्रयत्न झाला, यातून ती कशी बाहेर पडली? याबद्दल जाणून घेऊया.  

4/9
रिहर्सलवेळी घडला प्रसंग
रिहर्सलवेळी घडला प्रसंग

मी रिहर्सलसाठी आले होते. एक स्क्रिप्ट होती, त्याची रिहर्सल सुरु होती. त्यावेळी अचानक दिग्दर्शकांचा मला कॉल आला होता. आता तू कुठे आहेस? असं त्यांनी विचारलं. 

5/9
'माझ्या स्टुडिओला ये..'
'माझ्या स्टुडिओला ये..'

मी म्हणाले, प्रोजेक्टच्या रिहर्सलसाठी आले आहे. मग ते म्हणाले की, तुला किती वेळ आहे? मी म्हटलं मला वेळ लागेल. ते म्हणत होते की, माझ्या स्टुडिओला ये..' अशी कटु आठवण तिने सांगितले.

6/9
'तू लगेच इथं आली पाहिजेस'
'तू लगेच इथं आली पाहिजेस'

आता मी नाही येऊ शकतं. मला वेळ लागणार आहे. काय झालं? असं काय काम आहे? असं मी त्यांना विचारलं. मग ते दिग्दर्शक म्हणाले, तू मला विचारायचं नाही. काय काम आहे? मी तुला सांगितलं की, तू लगेच इथं आली पाहिजेस.., असे त्या दिग्दर्शकाने सांगितल्याचे राजेश्वरी म्हणाली.

7/9
मी स्पष्टपणे सांगितलं
मी स्पष्टपणे सांगितलं

यानंतर मी दुसऱ्या दिग्दर्शक सरांसमोर रडायला लागले होते. त्यांनी विचारलं काय झालं? ते म्हणाले, अशा गोष्ट होत राहतात. दुसरा विषय कॉम्प्रोमाईजचा देखील आहे. लोक विचारायला घाबरत नाहीत. चुकीचं आहे. मी असं काही करत नाही, हे मी स्पष्टपण सांगितल्याचे ती म्हणाली.

8/9
मी यातून शिकतेय
मी यातून शिकतेय

मी मालिकांमध्ये काम करण्यासही प्रयत्न केले आहेत. मात्र, तिथे सिलेक्ट होऊन मी रिप्लेस झालेली आहे. माझ्यामागे कोणतं बॅनर किंवा नाव नसल्याने तसं झाल्याचे राजेश्वरीने सांगितले.मला अनेकदा रिप्लेस करण्यात आलंय. त्याचं मला दु:ख नाहीये. मी यातून शिकत असल्याचे ती म्हणाली.

9/9
तो दिग्दर्शक कोण?
तो दिग्दर्शक कोण?

इंडस्ट्रीत तुला वाईट अनुभव येतील पण त्यांना समोरे जाण्यासाठी तू अगोदर स्ट्राँग पाहिजेस, असे असे गार्गी ताईंने सांगितले होते, असे ती म्हणाली. दरम्यान राजेश्वरी खरातने त्या दिग्दर्शकाचे नाव घेतले नाही. त्यामुळे तो कोण असू शकतो? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहेत. 





Read More