PHOTOS

शेवटी प्रीतीचा विंचू चावला, जब्याला शालू मिळाली, खऱ्या आयुष्यातही दोघे एकत्र? लग्नानंतरचा फोटो व्हायरल

'फँड्री' चित्रपटातील जब्या आणि शालू हे खऱ्या आयुष्यातही जोडीदार असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांचा लग्नानंतरचा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. 

Advertisement
1/8

'फँड्री' चित्रपटातील प्रसिद्ध जोडी शालू आणि जब्या हे त्यांच्या अभिनयासोबतच ते वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. 

2/8

अशातच आता जब्या आणि शालूचा लग्नानंतरचा एक फोटो खूपच व्हायरल होत आहे. या फोटोचे कॅप्शन देखील चर्चेत आलं आहे.

3/8

सोशल मीडियावर शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात आणि जब्या म्हणजे सोमनाथ अवघडे नेहमीच सक्रीय असतात. 

4/8

नुकताच राजेश्वरी खरातने इन्स्टाग्रामवर सोमनाथबरोबरचे काही फोटो पोस्ट केलेत. ज्यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे. 

5/8

या फोटोमध्ये राजेश्वरी सोमनाथबरोबर रोमँटिक होताना दिसत आहे. या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. 

6/8

अभिनेत्रीने या फोटोंना 'अजूनही मला वाटतं स्वप्न आहे सगळं' असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे या दोघांचं खरचं लग्न झालं आहे का असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे. 

7/8

दोघांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर काही चाहत्यांनी जब्याला शेवटी काळी चिमणी घावली अशी कमेंट केली आहे. 

8/8

दोघांनाही 'फँड्री' चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. खऱ्या आयुष्यातही दोघे एकत्र यावे असे काही चाहत्यांनी म्हटलं आहे. 





Read More