PHOTOS

2024 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेट 60 कोटी अन् कमाई 857 कोटी, रचला नवीन इतिहास

60 कोटींचं बजेट अन् कमाई 857 कोटी रुपये. 2024 च्या 'या' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ. ठरला ब्लॉकबस्टर. जाणून घ्या सविस्तर 

Advertisement
1/7
'पुष्पा 2'
'पुष्पा 2'

सध्या बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' चित्रपट धुमाकूळ घालत आहे. मात्र, या आधी 60 कोटीचे बजेट असणाऱ्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. 

2/7
रेकॉर्डब्रेक कमाई
रेकॉर्डब्रेक कमाई

2024 मध्ये अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटाने बजेटच्या कितीतरी पटीने अधिक कमाई करून इतिहास रचला. 

3/7
ब्लॉकबस्टर
ब्लॉकबस्टर

आम्ही 2024 मधील ऑल-टाइम ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट 'स्त्री 2' बद्दल बोलत आहोत. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर कब्जा केला. 

4/7
15 ऑगस्ट
15 ऑगस्ट

या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 'खेल खेल में' आणि 'वेद' चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर पराभूत केले. 

5/7
बॉक्स ऑफिस कलेक्शन
बॉक्स ऑफिस कलेक्शन

'स्त्री 2' चित्रपटाचे बजेट हे 60 कोटी रुपये इतके होते. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर जगभरात 857 कोटी रुपयांची कमाई केली. 

6/7
खेल खेल में
खेल खेल में

अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हा चित्रपट 95 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 54.8 कोटींची कमाई केली. 

7/7
वेदा
वेदा

जॉन अब्राहमचा 'वेदा' हा चित्रपट 60 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर जगभरात 26.71 कोटी रुपयांची कमाई केली होती. 





Read More