Travel App News : तुम्हीही प्रवासाला निघण्याच्या विचारात आहात का? तर हे एक अॅप तुमची बरीच मदत करणार आहे...
महामार्गांवरून प्रवास करत असताना अनेकदा प्रवासादरम्यान काही गोष्टींची आवश्यकता भासते. त्यातील सर्वात मह्त्वाची गरज असते ती म्हणजे इंधन अर्थात पेट्रोल- डिझेल आणि सीएनजीची.
अनोळखी वाटांवर निघालं असता अनेकदा ही महत्त्वाची माहिती आपल्या हाताशी नसते. बऱ्याचदा नेटवर्क नसल्यामुळं दुर्गम भागांमध्येही अनेकदा ही अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा प्रसंगी तुम्हाला किती रुपयांचा टोल भरावा लागणार यासंबंधीचीही माहिती मिळणार आहे.
Nearest repair shop, तुमच्या नजीकचा पेट्रोल पंप, नजीकचं रेस्तराँ, यासंबंधीची माहिती तुम्हाला राजमार्ग यात्रा अॅपवरून मिळणार आहे.
यासाठी तुम्ही फक्त अॅपस्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करणं अपेक्षित आहे. त्याशिवाय दूरध्वनी क्रमांकाच्या मदतीनं तुम्ही यावर लॉगईन करू शकता.
अॅप सुरु केल्यानंतर तिथं तुम्हाला Highway Amenities हा पर्याय दिसेल. इथं क्लिक केल्यास Medical, Fuel, ATM सह रेस्तराँचा पर्यायही तुम्हाला इथं उपलब्ध होईल.
राजमार्ग यात्रा अॅपमुळं तुम्हाला Fastag recharge, total distance आणि weather report ची माहितीसुद्धा मिळणार आहे.
अॅपमध्ये तुम्हाला Emergency helpline 1033 आणि पोलीस हेल्पलाइन क्रमांक 112 ची सुविधा देण्यात आली आहे. ज्या माध्यमातून तुम्ही वेळप्रसंगी अपेक्षित मदतही मिळवू शकता.
अॅपमध्ये असणाऱ्या जियो टॅगमुळं तुम्ही एखाद्या संकटात सापडल्यास या अॅपवरून मदत घेत असताना संबंधित अधिकाऱ्यांना तुमचं अचूक लोकेशन मिळू शकणार आहे.