Mika Singh And Rakhi Sawant: ही गोष्ट आजची नाही तब्बल 17 वर्षांनंतर झाली. जेव्हा गायक मिका सिंग आणि अभिनेत्री राखी सावंत फ्रेंड होते. मिका सिंगच्या वाढदिवसाला गायकाने अचानक राखीला किस केली. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
आता मिका सिंगने राखी सावंतने दाखल केलेली FIR रद्द करण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात त्याने याचिका केली आहे.
आता मिका सिंगने राखी सावंतने दाखल केलेली FIR रद्द करण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात त्याने याचिका केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. खंडपीठाने पुढील आठवड्यात पुन्हा सुनवाणी होणार असल्याचं सांगितलं. पुढील आठवड्यापर्यंत नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
कोर्टात मिकाचा वकीलाने बाजू मांडताना म्हटलं की, ''मिका आता कामात बिझी आहे. तो हे प्रकरण कधीच विसरला आहे. त्यामुळे तिच्या विरोधातील तक्रार रद्द करण्यात यावी.''
''राखी सावंत सध्या कामात खूप बिझी आहे. या दोघांनी हे प्रकरण मिटवलं आहे, त्यामुळे ही तक्रार रद्द केल्यास काही हरकत नाही'', असं राखीचे वकील आयुष पासबोला यांनी कोर्टात म्हटले.
17 वर्षांपूर्वी म्हणजे 2006 ची गोष्ट होती. मिका सिंह यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राखी सावंत आली होती. त्यावेळी केक कट केल्यानंतर अचानक मिकाने राखीला जबरदस्ती किस केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
यावेळी मुंबई पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली मिकाला अटकही केली होती. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं.
मिकाने आतापर्यंत अनेक हिट गाणे गायली आहेत. 'पार्टी तो बनती है', 'सुबह होने न दे', गंदी बात, वीर दी वेडिंग यासारखे अनेक गाणी गायली आहेत.