रक्षाबंधन अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलं आहे. भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. तर भाऊदेखील बहिणीला भेटवस्तु देतो.
रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्यायचं असा विचार तुम्हीदेखील करताय का. हल्ली बाजारात इतके नवीन पर्याय उपलब्ध झालेत की खूप गोंधळ उडतो. आम्ही तुम्हाला काही पर्याय सुचवत आहोत.
बहिणींना छान भेटवस्तु द्यायचीये पण बजेटही कमी आहे. 500 रुपयांच्या आत या वस्तु तुम्ही बहिणीला घेऊन देऊ शकतात. पाहा यादी
बहिणीला तुम्ही एखादं ट्रेंडी घड्याळ गिफ्ट देऊ शकतात. आजकाल बाजारात ब्रेसलेट व घड्याळ अशा वेगळ्या प्रकारचे घड्याळ मिळतात. 500 रुपयांच्या आत विविध ट्रेंड्स व प्रकारचे घड्याळ तुम्ही घेऊ शकता.
500 रुपयांच्या आत चांदीचे छोटेसे कानातले तुम्ही खरेदी करु शकता. रोजच्यासाठी वापरायला किंवा कॉलेजमध्ये जाताना हे इअरिंग्स खूप छान दिसतात. छोटेसे आणि वापरायलादेखील हलके असल्याने तरुणींनाही खूप कम्फरटेबल वाटतात.
तुमची बहिण कॉलेजला जाणारी असेल किंवा ऑफिसला जात असेल तर त्यानुसार तिच्यासाठी तुम्ही बॅग खरेदी करु शकता. हल्ली स्लिंग बॅग खूप जास्त ट्रेंडिग आहे. यात अनेक पर्यायदेखील मिळतात. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अनेक वेबसाइटवर सेलदेखील असतात. तिथून तुम्ही 500 रुपयांत बॅग खरेदी करु शकतात.
हल्ली तरुणी त्यांच्या स्कीनकेअरबाबत खूप सजग असतात. त्यामुळं त्यांच्या आवडीच्या ब्रँडचे प्रॉडक्ट तुम्ही त्यांना गिफ्ट देऊ शकता. तसंच, मेकअपचे साहित्यही देऊ शकता. हे सर्व 500 रुपयांच्या आत नक्कीच येईल.
हल्ली कस्टमाइज गिफ्टचा ट्रेंड आहे. तुमच्या बहिणीला आवडणाऱ्या गोष्टी किंवा एखादी आठवण कायम सोबत राहावी यासाठी तुम्ही कस्टमाइज गिफ्ट तयार करुन तिला देऊ शकतात. उदा. कॉफीमग, उशीवर फोटो, वॉलेटवर नाव लिहिणे, असे अनेक कस्टमाइज गिफ्ट करता येतात.