PHOTOS

Raksha Bandhan 2025: राखी बांधताना किती गाठी बांधाव्यात? 2, 3 की 5? जाणून घ्या यामागचं धार्मिक महत्त्व

रक्षाबंधन हे बहिण भावाच्या मनातल्या प्रेमाचं नातं राखीच्या माध्यमातून अजून घट्ट करत असते. पण, राखी बांधताना काही खास नियमही असतात, विशेषतः राखीत गाठी घालण्याबाबत.
 

Advertisement
1/8

रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी हा सण 9 ऑगस्ट, शनिवार रोजी येणार आहे. 

2/8

या दिवशी बहिण भावाच्या मनातल्या प्रेमाचं नातं राखीच्या माध्यमातून अजून घट्ट करत असते. पण, राखी बांधताना काही खास नियमही असतात, विशेषतः राखीत गाठी घालण्याबाबत.

3/8

राखी म्हणजे फक्त धागा नव्हे, तर भावाच्या दीर्घायुष्याची आणि समृद्ध आयुष्याची बहिणीने मागितलेली एक प्रार्थना. त्यामुळे राखी बांधताना किती गाठी घालाव्यात, यालाही धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे.

4/8

परंपरेनुसार, बहिणीने राखी बांधताना तीन गाठी घालाव्यात, असं मानलं जातं. यामागे एक विशिष्ट अर्थ आहे: पहिली गाठ – भावाच्या सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याचं प्रतीक,  दुसरी गाठ – प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक, तिसरी गाठ – मर्यादा, सत्य आणि बहिणीच्या सन्मानाचं प्रतीक या तिन्ही गाठी म्हणजे बहिण भावाच्या नात्यातील बंध अधिक मजबूत करणाऱ्या मूल्यांचा प्रतीकात्मक आविष्कार आहे.

5/8

अनेक ठिकाणी बहिणी 5 गाठी घालतात. यामागे पंचतत्वांचा संदर्भ आहे  पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश. या 5 गाठी म्हणजे जीवनातील समत्व, स्थैर्य आणि नैसर्गिक संतुलनासाठी केलेली प्रार्थना असते. यामुळे राखी अधिक पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते.

 

6/8

  “ॐ येन बद्धो बलि राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल॥” राखी बांधताना हा मंत्र म्हणणं शुभ मानलं जातं. हा मंत्र राक्षस बली राजावर बांधलेली रक्षासूत्र आठवतो आणि त्याच शक्तीने भावालाही रक्षण मिळो, असा आशय मांडतो.

7/8

थोडक्यात, राखी बांधणं ही एक परंपरा असली, तरी तिच्यामागे मूल्यांची आणि आशीर्वाद असतो. गाठी किती घालाव्यात, यापेक्षा त्या गाठींमध्ये किती भावना गुंफलेल्या आहेत, हे अधिक महत्त्वाचं आहे.

 

8/8

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 





Read More