राखीपौर्णिमेचा सणदेखील यंदा इको फ्रेंडली स्वरूप धारण करत आहे. सुती, रेशमी धागा बांधून रक्षाबंधन साजरे केले जाते. मात्र फॅन्सी राख्या केवळ तेवढ्यापुरत्याच आनंद येतात. यामध्ये प्लॅस्टिकचा वापर असल्याने त्याचं विघटन होणं कठीण होते. म्हणूनच यंदा डिजिटल राख्यांसोबत काही इको फ्रेंडली राख्याही उपलब्ध आहेत.
यंदा केवळ भावाचं तोंड गोड करायलाचा नव्हे तर त्यांच्या मनगटावरही चॉकलेट सजणार आहे. ही अनोखी राखी पुण्यात बनवली गेली आहे.
पुण्यात एका बेकरीत खास लहान मुलांसाठी अशा राख्या बनवल्या आहेत. बेकरीत चॉकलेट राखी पांडा, कुकी, केक, टेडी बिअर अशा विविध आकारात उपलब्ध आहे.
लहानांपासून प्रौढांपर्यत विविध ढंगात राखीपौर्णिमेसाठी राख्या सज्ज आहेत. यामध्ये अल्फाबेट, फुलं, थ्रीडी शेपमधील राख्या उपलब्ध आहेत. चॉकलेट राख्या यंदा अनेकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. काही राख्या तिरंग्यामध्ये उपलब्ध आहेत.
यंदा रक्षाबंधनाचा सण रविवारी आला आहे. त्यामुळे विकेंंडला सर्वत्रच डबल सेलिब्रेशन आहे. श्रावणातील पौर्णिमेला साजरी होणारी राखी पौर्णिमा यंदा सेलिब्रेट करण्यासाठी कोणत्या खास शुभ मुहुर्ताची गरज नाही, यंडा पौर्णिमेच्या 24 तासात कधीही रक्षाबंधन साजरे करू शकता.