अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील 'माझा होशील ना' या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रेम दिलं. लॉकडाऊननंतर शूटिंग सुरु होऊन जवळपास २ महिने होत आले आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव कॅमेराच्या मागे काम करणारी मंडळी आणि काही कलाकार यांच्या राहण्याची सोय सेटवरच करण्यात आली आहे. त्यामुळे ही मंडळी आपापल्या घरी जाऊ शकत नाही आहे.
आपल्या घरापासून लांब असलेल्या या कलाकारांना रक्षाबंधनाला देखील घरी जाता येणार नाहीये. कुटुंब जरी सेटपासून दूर असलं तरी सेटवरचं हे नवं कुटुंब जास्त जवळ येत चाललं आहे.
रक्षाबंधनाचं औचित्य साधून आपल्या सर्वांची लाडकी 'सई' म्हणजेच गौतमी देशपांडेने सेटवर काम करणारे स्पॉट दादा सदाभाऊ, जे दिवस रात्र सेटवरच्या लोकांची बडदास्त ठेवत असतात. प्रेमाने जेवू घालत असतात. एका हाकेला मदतीला तयार असतात. त्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला.