Sai Pallavi Net Worth: साऊथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री साई पल्लवी ही नितेश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात सीतेची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट लकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मात्र, 'रामायण' चित्रपटातील सीता म्हणजेच साई पल्लवी ही अभिनयासोबतच MBBS डॉक्टर देखील आहे.
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री सौंदर्यामुळे चर्चेत असतात. मात्र, साई पल्लवी ही तिच्या विना मेकअप लुकमुळे देखील नेहमी चर्चेत असते.
अभिनेत्री अनेक चित्रपटांमध्ये विना मेकअप लूकमध्ये दिसली आहे. त्यासोबतच ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
साई पल्लवीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तमिल, तेलुगु आणि मल्याळम इंडस्ट्रीमध्ये देखील तिने चित्रपट केले आहेत. तिला अवॉर्ड देखील मिळाले आहेत.
अभिनेत्री साईने जॉर्जियामधील Tbilisi State Medical University मधून MBBS चं शिक्षण पूर्ण केलं आहे. ती एक डॉक्टर आहे.
डॉक्टरचे शिक्षण घेऊन अभिनेत्रीने डान्स आणि अभिनयामध्ये करिअर बनवलं. तिचा अभिनय आणि सिंपल लूक चाहत्यांना नेहमी आकर्षित करतो.
लवकरच तिचा 'रामायण' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार तिची एकूण संपत्ती 47 कोटी रुपये इतकी आहे.