सोशल मीडियावर स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. तैमूर, जेह, वामिका यांसोबतच आणखी एका स्टरकिडची भर पडली आहे. ती म्हणजे, रणबीर-आलियाची मुलगी राहा कपूर. ख्रिसमसच्या दिवशीच रणबीर-आलियाने त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रणबीरच्या कुशीत बसलेल्या राहाचे गोंडस फोटो व्हायरल झाले आहेत.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या चिमुकल्या मुलीसोबत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परदेशात गेले होते. इतक्यातच ते सह कुटुंब मुंबईत परतले आहेत. यावेळी बेबी राहा तिच्या कुल डॅडीसोबत दिसत आहे. रणबीर आणि बेबी राहाचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
आलिया आणि रणबीर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी कुठे गेले होते, हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये.
रणबीर आणि आलिया बाहेर येताच पॅपाराझीने त्यांच्याभोवती गराडा घातला. यावेळी रणबीरने राहाला त्याच्या कुशीत घेतले होते.
राहाने गुलाबी रंगाचे एक जॅकेट घातले आहे. तर, तिच्या हातात एक खेळणेही दिसत आहे.
रणबीर कपूरही राहाला पॅपाराझीच्या गराड्यापासून सांभाळून नेताना दिसत आहे. राहाला प्रेमाने सांभाळणाऱ्या रणबीरला पाहून चाहतेही कौतुक करत आहेत.
रणबीर आणि आलिया दोघेही यावेळी कुल लूकमध्ये होते.
रणबीर आणि आलियाच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास अलीकडेच रणबीरचा अॅनिमल चित्रपट प्रदर्शित झाला होता तर, आलिया रॉकी और रानी की प्रेम कहाणी चित्रपटात दिसली होती.