PHOTOS

रणबीर कपूरचा 14 वर्ष जुना चित्रपट; दीपिका पदुकोण पहिली पसंती असूनही 'ही' नवखी अभिनेत्रीच जास्त गाजली

Big Blockbuster Bollywood Movie: रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेले चित्रपट एकत्र केले आहे. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे. दोघांच्या वैयक्तिक नात्यातील उबदारपणा त्यांच्या अभिनयातही दिसून येतो. आज आपण रणबीरच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल पाहाणार आहोत ज्या चित्रपटासाठी रणबीरसोबत आधी दीपिका झळकणार होती, परंतु दीपिकाला घेण्याऐवजी या अभिनेत्रीला चित्रपटात घेण्यात आले.

Advertisement
1/8

एका खास चित्रपटासाठी ही हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार होती. पण काही कारणास्तव त्या भूमिकेसाठी अंतिम निवड दीपिकाऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीची झाली. ही बाब फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांनी 'बचना ए हसीनों' (2008), 'ये जवानी है दिवानी' (2013) आणि 'तमाशा' (2015) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.

2/8

हा चित्रपट आहे 'रॉकस्टार'. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 14 वर्षे उलटली आहेत. जेव्हा रणबीर या भूमिकेत झळकला, तेव्हा त्याने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आणि तो रातोरात एक सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला. या चित्रपटाद्वारे नर्गिस फाखरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिलाही या चित्रपटामुळे जबरदस्त ओळख मिळाली.

3/8

खास गोष्ट म्हणजे या भूमिकेसाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती दीपिका पदुकोण होती. इम्तियाज अली यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये स्वतः खुलासा करताना सांगितले की, दीपिकाला पहिल्यांदाच भेटल्यानंतरच त्यांना वाटले होते की तीच त्यांच्या कथेतील मुख्य व्यक्तिरेखेसाठी योग्य आहे. तेव्हा दीपिकाचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. पण तिच्या व्यक्तिमत्त्वावर इम्तियाज भारावले होते.

4/8

तथापि, काही अपरिहार्य कारणांमुळे आणि चित्रपटाच्या उशिरा निर्मितीमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या. परिणामी, दीपिकाच्या ऐवजी दुसरी अभिनेत्री ही भूमिका साकारताना दिसली. रणबीर आणि नर्गिसची जोडीही प्रेक्षकांना तितकीच भावली.

 

5/8

चित्रपटाने 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होऊन जागतिक बॉक्स ऑफिसवर तब्बल 108 कोटींचा गल्ला जमवला. हे यश पाहता तो रणबीरच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट मानला जातो. त्याच्या अभिनयातील तीव्र भावना, संगीतमय पार्श्वभूमी आणि उत्कट कथा यामुळे प्रेक्षक या चित्रपटाशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले.

6/8

हा चित्रपट केवळ यशस्वीच नव्हता. तर त्याने अनेक पुरस्कार आणि गौरवही पटकावले. इतकंच नव्हे, तर चित्रपटाच्या प्रदर्शनाला 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याची पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीझ करण्यात आली आणि प्रेक्षकांनी त्यावेळीही तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद दिला.

7/8

याच दरम्यान, दीपिका पदुकोण आणि इम्तियाज अली यांचं नातं पुन्हा जुळलं आणि त्यांनी 'लव्ह आज कल' (2009), 'कॉकटेल' (2012) आणि 'तमाशा' (2015) सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. दीपिका आणि रणबीरची ऑन-स्क्रीन जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. त्यांच्या केमिस्ट्रीचं आकर्षण असो वा एकत्र सादर केलेले सिनेमे, प्रत्येक वेळी त्यांनी एक वेगळी छाप सोडली आहे.

 

8/8

हा चित्रपट केवळ एका नायकाच्या प्रवासाची गोष्ट नव्हती, तर त्यामागील भावना, संघर्ष आणि आत्मशोधाची होती. जी आजही लोकांच्या मनात घर करून आहे.

 





Read More