rashmika mandhana birthday special: दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आज 5 एप्रिल 2025 रोजी तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिकंदर' या चित्रपटाच्या यशामुळे ती सध्या खूपच चर्चेत आहे.
रश्मिकाने आपल्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून केली आणि नंतर बॉलिवूडमध्येही यशस्वी पदार्पण केलं. तिने 'छावा', 'अॅनिमल', 'गुडबाय', 'मिशन मजनू' यांसारख्या चित्रपटांमधून आपला अभिनय सादर केला आहे. तसेच 'पुष्पा: द रुल' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून तिने मोठं यश मिळवलं. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडून नवा इतिहास रचला आहे.
रश्मिका मंदानाची एकूण संपत्ती जवळपास 66 कोटी रुपये आहे. ती प्रत्येक चित्रपटांसाठी सुमारे 4 ते 8 कोटी रुपये मानधन घेते. तिचं जीवनशैली अत्यंत आलिशान आणि विलासी आहे.
रश्मिकाचं बंगळुरूमध्ये 8 कोटी रुपयांचा भव्य बंगला आहे. जिथे सुंदर बाग आणि लक्झरी इंटिरीयरसह सजवलेलं घर आहे. तसेच कुर्ग, हैदराबाद आणि गोवा या शहरांमध्ये देखील तिच्या मालकीचे महागडे अपार्टमेंट्स आणि बंगले आहेत. अलीकडेच तिने गोव्यात एक नवीन आलिशान बंगला खरेदी केला आहे, जिथे ती वेळोवेळी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसते.
रश्मिकाकडे रेंज रोव्हर स्पोर्ट कार आहे. याची किंमत 1.84 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय तिच्याकडे इतरही गाड्या आहेत. ऑडी Q3 या कारची किंमत 40 लाख रुपये, मर्सिडीज-बेन्झ Cक्लास 50 लाख रुपये, टोयोटा इनोव्हा आणि ह्युंदाई क्रेटा या इतर गाड्या आहेत. रश्मिकाला या लक्झरी गाड्यांची खूप आवड आहे.
रश्मिका अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी अँबेसिडर म्हणूनही काम करते. जाहिरातींमधून आणि सोशल मीडियावरूनही तिला मोठ्या प्रमाणावर कमाई होते.
रश्मिका मंदाना ही आजच्या काळात सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे सौंदय आणि अभिनय लोकांना खूप आवडतो. तिने तिच्या मेहनतीने अनेक हिट चित्रपटांमधून काम करुन इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे.
नुकतीच रश्मिका मंदाना ही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकित झाली आहे. तिला तिच्या अभिनयासाठी 'फिल्मफेअर', 'झी सिने' आणि 'साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स' (SIIMA) यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तिच्या प्रेक्षकांशी असलेल्या जवळच्या नात्यामुळे ती सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या इंस्टाग्रामवर 30 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती आपल्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असते. तिचं हसतमुख व्यक्तिमत्त्व आणि प्रामाणिकपणा हे तिच्या यशामागील खरे गुपित आहे.