PHOTOS

भारतीय नसतानाही TATA Sons मध्ये 1520560 कोटींची भागिदारी; कोण आहे ही व्यक्ती?

रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांना टाटा समुहाच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं. यानंतर आता टाटा समुहामध्ये असणाऱ्या इतर गुंतवणुकदारांची बरीच चर्चा होताना दिसत आहे. 

Advertisement
1/7
गुंतवणूक
गुंतवणूक

टाटा समुहामध्ये अनेक धनाढ्यांची गुंतवणूक आहे. असं असतानाच एका कुटुंबाच्या भागिदारीची विशेष चर्चा होते. हे कुटुंब म्हणजे, शापूरजी पल्लोनजी समुहाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या शापूर मिस्त्री यांचं. त्यांच्या एकूण संपत्तीची चर्चा होताना कायमच टाटांच्या व्यवसायात असणाऱ्या त्यांच्या 18.4 टक्के गुंतवणुकीची चर्चा होते. 

 

2/7
130 अब्ज डॉलर
130 अब्ज डॉलर

मिस्त्री कुटुंबानं टाटा समुहामध्ये साधारण 130 अब्ज डॉलर म्हणजेच 1520560 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या रकमेच्या बळावर मिस्त्री कुटुंब टाटा समुहातील सर्वात मोठे शेअरहोल्डर ठरतात.  

 

3/7
योगदान
योगदान

शापूरजी पल्लोनजी ग्रुपची सुरुवात साधारण 159 वर्षांपूर्वी झाली होती. अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रात या समुहाचं मोलाचं योगदान. 1964 मध्ये जन्मलेल्या शापूर म‍िस्‍त्री यांना दोन बहिणी आणि एक भाऊ, ज्याचं नाव सायरस मिस्त्री. 

4/7
निधन
निधन

सायरस मिस्त्री यांचं 2022 मध्ये अपघाती निधन झालं. वडील आणि भावाच्या निधनानंतर शापूरजी यांनी कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली. 

 

5/7
सायरस मिस्त्री आणि शापूरजी
सायरस मिस्त्री आणि शापूरजी

निधनापूर्वी सायरस मिस्त्री आणि शापूरजी एकत्र काम करायचे. आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रीत करत त्या स्थिरस्थावर करण्यासाठी ते संपत्तीच्या विक्रीवर भर देताना दिसले. या प्रक्रियेदरम्यान कौटुंबीक व्यवसाय पुढे नेताना भावनिक आणि कार्यकारी स्तरावर अनेक आव्हानांचा सामना केला. 

6/7
भागिदारी
भागिदारी

मिस्त्री कुटुंबाच्या संपत्तीमध्ये प्रामुख्यानं टाटा समुहातील त्यांची भागिदारी आणि टाटांशी असणारं नातं महत्त्वाची भूमिका बजावतं. शापूरजींचे वडील पल्लोनजी म‍िस्‍त्री यांनी टाटा मुख्यालयात प्रभावी उपस्थिती आणि योगदानासाठी Phantom of Bombay House हा किताबही मिळवला होता. 

 

7/7
पदत्याग
पदत्याग

2012 मध्ये टाटा समुहाच्या अध्यक्षपदी आलेल्या सायरस मिस्त्री यांच्यामुळं हे कुटुंब पुन्हा चर्चेत आलं. 2016 मध्ये काही वादग्रस्त कारणांमुळं त्यांना पदत्याग करावा लागला. 

 





Read More