PHOTOS

वयाच्या 84 व्या वर्षी रतन टाटांनी आनंद महिंद्रांनाही मागे टाकलं! 'या' स्पेशल यादीत टाटा नंबर वन

Ratan Tata Surpasses Anand Mahindra: टाट ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटांनी उद्योजक आनंद महिंद्रांना मागे टाकलं आहे. रतन टाटांचं समाजिक क्षेत्रातील काम, प्राण्यांबद्दल त्यांना वाटणारं प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा साधेपणा प्रत्येकाला भावतो. याच रतन टाटांनी आता सर्वच उद्योजकांना एका विशेष यादीत मागे टाकलं आहे. जाणून घेऊयात ही यादी कोणती आणि नेमकं घडलं काय...

Advertisement
1/18

रतन टाटा ही पाच अक्षरं वाचली तर प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरुन येतो.

 

2/18

रतन टाटांचं समाजिक क्षेत्रातील काम, प्राण्यांबद्दल त्यांना वाटणारं प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा साधेपणा प्रत्येकाला भावतो.

3/18

रतन टाटांना भेटलेल्या, त्यांच्याशी बोलेल्या प्रत्येकाकडे त्यांच्याविषयी बोलायला बऱ्याच गोष्टी असतात. अगदी भरभरुन बोलतात लोक रतन टाटांबद्दल.

4/18

हेच रतन टाटा सध्या चर्चेत आहेत ते एका वेगळ्याच कारणाने. वयाच्या 84 व्या वर्षी रतन टाटांनी भारतीय उद्योग जगतामध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावे करुन घेतला आहे.

5/18

रतन टाटांनी यंदा महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांना मागे टाकत एका खास यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे.

6/18

हरुन इंडिया रिच लिस्ट 2023 मध्ये रतन टाटांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. या यादीत आधी कोण कोण आहे ते पाहूयात नंतर या यादीचं वैशिष्ट्यं काय आहे हे जाणून घेऊयात...

7/18

रतन टाटा हे एक्स म्हणजेच ट्वीटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले उद्योजक ठरले आहेत. या यादीत अव्वल 10 मध्ये कोण आहे त्यांचे किती फॉलोअर्स आहेत हे पाहूयात.

 

8/18

यादीत दहाव्या स्थानी कोटक बँकेचे उदय कोटक असून त्यांचे एकूण 11 लाख फॉलोअर्स आहेत असं 360 वन हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 मध्ये म्हटलं आहे.

9/18

नवव्या स्थानी किरण मुझुमदार-शॉ आहेत. त्यांचे ट्वीटरवर एकूण 16 लाख फॉलोअर्स आहेत. 

10/18

आठव्या स्थानी हर्ष गोयंका आहेत. त्यांचे एकूण 18 लाख फॉलोअर्स असून त्यांचे फॉलोअर्स 1 लाखांनी वाढले आहेत.

11/18

सातव्या स्थानी रॉनी स्क्रूवाला असून त्यांचे एकूण 20 लाख फॉलोअर्स आहेत.

12/18

नंदन निलेकणी या यादीमध्ये सहाव्या स्थानी असून त्यांना 25 लाख लोक ट्वीटरवर फॉलो करतात. 

13/18

सत्या नडेला या यादीमध्ये 30 लाख फॉलोअर्ससहीत पाचव्या स्थानी आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 2 लाखांनी वाढली आहे.

14/18

या यादीमध्ये चौथ्या स्थानावर सुंदर पिचाई आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 7 लाखांनी वाढली आहे. त्यांचे एकूण 53 लाख फॉलोअर्स आहेत.

 

15/18

पतांजलीचे आचार्य बाळकृष्ण हे सर्वाधिक ट्वीटर फॉलोअर्स असलेल्या उद्योजकांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांचे 66 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांचे फॉलोअर्स एका लाखांनी वाढलेत.

16/18

सर्वाधिक ट्वीटर फॉलोअर्स असलेल्या उद्योजकांच्या यादीत आनंद महिंद्रा दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत 11 लाखांनी भर पडली असून एकूण फॉलोअर्स 1 कोटी 8 लाख आहेत.

17/18

ट्वीटरवर फारसे सक्रीय नसलेले रतन टाटा हे सर्वाधिक फॉलोअर्स असलेले भारतीय उद्योजक आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या या वर्षामध्ये 8 लाखांनी वाढली आहे.

18/18

रतन टाटा यांना ट्वीटरवर 1.26 कोटी लोक फॉलो करतात.





Read More