झी मराठी वरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही मालिका आता रंजक अशा वळणावर आली आहे.
मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरुन प्रतिसाद दिला. तसाच प्रतिसाद या दुसऱ्या भागाला देखील मिळत आहे. मालिकेला मिळणाऱ्या यशाचं श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं.
'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.
मराठी मालिका विश्वात 'अण्णा नाईक' आणि 'शेवंता' ही दोन नावं बरीच चर्चेत आहेत. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात या दोन पात्रांना मिळणारी लोकप्रियता शब्दांतही व्यक्त न करता येण्याजोगीच आहे.
शेवंता अण्णा नाईकांशी लग्न करून नाईक वाड्यात प्रवेश करणार आहे. इकडे माईने घरात हळदी कुंकवाचा घाट घातला आहे. इतक्यात हातात हिरवाचुडा, कपाळावर मोठ्ठ कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून शेवंता दारातउभी राहते.
शेवंताला पाहून सगळ्यांना धक्का बसतो. शेवंताने तिचा पण पूर्ण केला. शेवंताने अण्णांशी लग्न केल पण तिला नाईकवाड्यात प्रवेश मिळेल की या मागे सुद्धा अण्णांचा काही कारस्थान आहे? हे येणाऱ्या भागात कळेलच.
एका रंजक अशा वळणावर आलेल्या रात्रीस खेळ चाले २ मालिकेचे येणारे भाग रात्री १०.३० वाजता. आपण झी मराठीवर पाहू शकता.