Ravi Shastri Meet Most Beautiful Tennis Female Player: कॉमेंट्री बॉक्स असो किंवा सोशल मीडिया असो रवी शास्त्री हे क्रिकेट चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असतात. आपल्या क्रिकेट विषय ज्ञानाबरोबरच इतरही बऱ्याच गोष्टींमुळे भारताचे हे माजी प्रशिक्षक चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या त्यांनी पोस्ट केलेला एक फोटो चर्चेत आहे. जाणून घेऊयात त्याचसंदर्भात...
रवी शास्त्री... तशी भारतीयांना या साडेचार अक्षरांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. मात्र सध्या रवी शास्री चर्चेत आहेत ते एका महिला टेनिसपटूमुळे!
अगदी पहिला वर्ल्ड कप जिंकणारा संघ असो किंवा भारतीय संघाचे प्रशिक्षक असो किंवा अगदी सध्या कॉमेंट्री बॉक्समधून शाब्दिक षटकार लगावणं असो, भारतीयांनी रवी शास्त्रींची अनेक रुपं पाहिली आहेत.
आपल्या वाचेवरील प्रभुत्व, क्रिकेटबद्दलचं ज्ञान याचबरोबर रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जाणारे भारतीय संघाचे शास्त्री गुरुजी हे खऱ्या आयुष्यात फारच कूल आहेत. म्हणजेच जेन झेडच्या भाषेत सांगायचं झालं तर रवी शास्त्री एकदम कूल ड्यूड आहेत.
सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय समालोचकांमध्ये रवी शास्त्रींचा समावेश होतो.
रवी शास्त्री हे मैदानात जितके गंभीर दिसतात तितकेच सोशल मीडियावर रिलॅक्स आणि निवांत दिसतात. मग अगदी वर्ल्ड कप 2024 मध्ये कपडे विसरल्याचा किस्सा असो किंवा हटके जाहिरात असो रवी शास्री चर्चेत असतात.
सध्या रवी शास्त्री अशाच एका पोस्टमुळे चर्चेत आहेत. त्यांनी स्वत: एक भन्नाट फोटो शेअर केला आहे.
झालं असं की, रवी शास्त्री अचानक जगातील सर्वात सुंदर महिला टेनिसपटूंपैकी एकीला भेटले.
खरं तर रवी शास्त्री हे टेनिसचे मोठे चाहते आहेत. अनेक विम्बल्डन सामने त्यांनी प्रत्यक्षात मैदानात उपस्थित राहून पाहिलेत.
मात्र या सौंदर्यवतीला भेटल्यानंतर शास्त्रींबरोबर फॅन मोमेंट व्हावं असं काहीसं झाल्याचं त्यांच्या पोस्टवरुन दिसून येत आहे.
क्रिकेटच्या मैदानामधील खडा अन् खडा माहिती असलेल्या रवी शास्त्रींनी या टेनिसपटूबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.
या महिला टेनिसपटूने अनेक टेनिस स्पर्धा जिंकल्या असून एकेकाळी टेनिस जगतावर अधिराज्य केलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
रवी शास्त्री ज्या महिला टेनिसपटूला भेटले तिचं नाव आहे मारिया शारापोव्हा!
रशियाची माजी टेनिसपटू असलेली मारिया शारापोव्हा जगातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.
रवी शास्त्रींनी मारियाबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याला भन्नाट कॅप्शन दिली आहे.
"सुंदर अशा मारिया शारापोव्हाची अचानक भेट झाली. तिने टेनिसमध्ये कमाल करुन दाखवली आहे," असं शास्त्रींनी म्हटलं आहे.
"ज्या दर्जाचं टेनिस ती खेळली आणि तिने ज्या पद्धतीची स्टाइल टेनिस कोर्टवर आणली ते कौतुकास्पद आहे," असं शास्त्री म्हणाले.
शास्त्रींनी मारियाला "फॅशन आयकॉन" असंही म्हटलं आहे.
चाहत्यांनी रवी शास्त्रींच्या या पोस्टवर मजेदार कमेंट करताना, तिला सचिन तेंडुलकर कोण आहे विचारा, भारत-रशियामधील संबंध सुदृढ होत आहेत, असंही म्हटलं आहे.