Retail Inflation Rate: येत्या काही दिवसांत आरबीआयकडून गृह कर्ज (Home Loan) किंवा वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का मिळू शकतो.
पुढील आर्थिक अहवालामध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट वाढू शकतो. महागाई कमी करण्याच्या हेतूनं हा दर 0.25 टक्क्यांनी वाढू शकतो.
मागील वर्षाच्या मे महिन्यापासून आरबीआयकडून रेपो रेटमध्ये अडीच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये 0.25 टक्क्यांच्या वाढीनंतर हा रेपो रेट 6.50 टक्क्यांवर पोहोचला आहे.
अभ्यासकांच्या मते एप्रिल महिन्यात आरबीआयकडून हे बदल केले जाऊ शकतात.
महागाईचा दर डिसेंबर 2022 मध्ये 5.72 इतका होता. ज्यानंतर जानेवारी 2023 हा दर 6.52 वर पोहोचला. फेब्रुवारीत किंचित घट होऊन हा आकडा 6.44 वर पोहोचला.
या सगळ्याची गणितं आता हवामानाशीही जोडली जात आहेत. कारण, कृषी क्षेत्रावर याचे थेट परिणाम दिसून येऊ शकतात.
पुढच्या तीन महिन्यांमध्ये तापमानातील वाढ आणि त्यानंतर येणारा मान्सून याचेही या आकडेवारीवर आणि तुमच्याआमच्या आर्थिक गणितांवर थेट परिणाम होणार आहेत.