RCB Full Squad For IPL 2025 : आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पाडलं. या ऑक्शनमध्ये सहभागी झालेल्या 10 संघांनी एकूण 639. 15 कोटी रुपये खर्च करून 182 खेळाडूंना विकत घेतले. यंदा आरसीबीने कोणत्या खेळाडूंना खरेदी केलं जाणून घेऊयात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ आयपीएलच्या सुरुवातीपासून स्पर्धेचा भाग आहे. मात्र अद्याप एकदाही आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे यंदा आयपीएल 2025 चॅम्पियन होण्यासाठी ऑक्शनमध्ये काही महत्वाच्या खेळाडूंवर बोली लावून त्यांना विकत घेतलं.
ऑक्शनपूर्वी आरसीबीने केवळ 3 खेळाडूंना रिटेन केले होते त्यामुळे संघात एकूण 22 स्लॉट आणि ऑक्शनमध्ये खेळाडूंना खरेदी करण्यासाठी एकूण 83 कोटी रुपये शिल्लक होते. यापैकी 19 खेळाडूंना ऑक्शनमधून विकत घेत आता आरसीबीच्या पर्समध्ये केवळ 75 लाख रुपयेच शिल्लक आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल ऑक्शनपूर्वी विराट कोहली सह तीन खेळाडूंना रिटेन केलं होतं. यात विराट कोहली (21 कोटी), यश दयालरजत पाटीदार (11 कोटी) आणि यश दयाल (5 कोटी) यांचा समावेश होता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदा नव्या खेळाडूंना संधी देण्याकडे अधिक लक्ष दिले आणि संघाची बांधणी केली. ज्यामुळे आता नवीन संघ आपल्या कामगिरीने इतिहास रचून आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावण्यात यशस्वी होईल, अशी आशा आरसीबीच्या चाहत्यांना आहे.
आरसीबीने यंदा जोश हेजलवुडवर सर्वाधिक बोली लावून त्याला खरेदी केले. 2 कोटी बेस प्राईज असलेल्या हेजलहुडवर आरसीबीने तब्बल 12.50 कोटी खर्च केले.
आरसीबीने यंदा 12 कॅप्ड खेळाडूंना खरेदी केले. यात जोश हेजलवुड 12.50 कोटी, फिल सॉल्ट 11.50 कोटी, जितेश शर्मा 11 कोटी, भुवनेश्वर कुमार 10.75 कोटी, लियाम लिविंगस्टोन 8.75 कोटी, कृणाल पंड्या 5.75 कोटी, टीम डेव्हिड 3 कोटी, जैकब बेटेल 2.60 कोटी, देवदत्त पड्डीकल 2 कोटी, नुवान तुषार 1.60 कोटी, रोमारियो शेफर्ड 1.50 कोटी, लुंगिसानी एनगिडी 1 कोटी यांचा समावेश आहे.
आरसीबीने आयपीएल 2025 ऑक्शनमध्ये 7 खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं. यात रसिख डार 6 कोटी, सुयश शर्मा 2.60 कोटी, स्वप्निल सिंह 50 लाख, तर मोहित राठी, अभिनंदन सिंह, स्वस्तिक छिकारा, मनोज भंडागे यांना प्रत्येकी 30 कोटींना विकेट घेतलं.