PHOTOS

Sarkari Naukri 2023 : पदवीधर, 12 उत्तीर्ण त्वरा करा; 'ही' सरकारी नोकरी तुम्हाला करणार मालामाल

सध्याच्या घडीला नोकरीच्या शोधात असणाऱ्यांमध्ये सरकारी नोकरीकडे कल असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. 

Advertisement
1/5

खासगी क्षेत्रात असणाऱ्या अनिश्चिततेमुळं सध्याची तरुणाई सरकारी नोकरीचा पर्याय निवडताना दिसतेय. अशा सर्वांसाठीच एक सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. 

2/5

(RCFL Recruitment 2023 ) RCFL म्हणजेच राष्ट्रीय केमिकल फर्टिलायजर्स अँड लिमिटेडमध्ये 248 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचनासुद्धा जारी करण्यात आली आहे. नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीनं उमेदवारांनी 30 डिसेंबर 2022 ते 16 जानेवारी 2023 या काळात अर्ज करायचे आहेत. 

 

3/5

x ray technician पदासाठी एका जागेवर भरती होणार असून, यासाठीती शैक्षणिक पात्रता आहे, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 उत्तीर्ण (Full Time), एक्स रे, रेडिओग्राफीमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा. (RCFL Recruitment process)

4/5

technician trainee (Mechanical Engineering) या पदासाठी 38 जागांवर भरती होणार आहे. यामध्ये Full time म्हणजेच तीन वर्षांचं डिप्लोमा शिक्षण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. तर, technician trainee (Electrical Engineering) पदावर 16 जागांसाठी डिप्लोमा किंवा इंजिनियरिंगमध्ये चार वर्षे (8 semister) किंवा साडेतीन वर्षे (7 semister) असं शिक्षण घेणं अपेक्षित आहे. 

5/5

Operator trainee (Chemical) या पदासाठी 181 जागांवर भरती होणार असून, यासाठी शैक्षणित पात्रता पुढीलप्रमाणे.  BSC च्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात physics सोबतच बीएससी केमिकल्सचं पदवी शिक्षण अपेक्षित. 

 





Read More