PHOTOS

रेखाची आवडती गोष्ट अमिताभ जया यांना मुद्दाम देतात भेट? एका अनोख्या 'गिफ्ट'ची गोष्ट

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमाची चर्चा आजही होते. जया यांनी एक किस्सा सांगितल्या, त्या म्हणाल्या की, रेखाची आवडती गोष्ट अमिताभ जया यांना गिफ्ट म्हणून देतात. 

Advertisement
1/9

बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन आज आपला 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बी यांनी 1969 मध्ये आलेल्या 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. मात्र, 'जंजीर' हा चित्रपट त्यांच्या करिअरसाठी खास ठरला आणि त्यांना ओळख मिळवून दिली. 

2/9

अमिताभ हे त्यांच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. या अभिनेत्याचं लग्न जया बच्चन यांच्याशी झाले असलं तरी, अभिनेत्री रेखासोबतच्या त्याच्या अफेयरमुळे खूप चर्चेत असतात. 

3/9

आम्ही तुम्हाला सांगतो, अमिताभ आणि जया यांची प्रेम कहाणी 'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अमिताभ अनेकदा गुड्डीच्या सेटवर त्यांना भेटायला यायचे.

4/9

'जंजीर' चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर जया आणि अमिताभ बच्चन यांनी लग्न केलं. लग्नानंतरही दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. 

5/9

जया बच्चन यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी एका गिफ्टबद्दल गुप्त उघड केलं. अमिताभ बच्चन अनेकदा त्यांना सिल्क कांजीवरम साड्या भेट देतात. 

6/9

जया बच्चन यांनी सांगितले होतं की, त्यांना सिल्कच्या साड्या अजिबात आवडत नाहीत. अभिनेत्री म्हणाली होती की, पण अमिताभ यांना वाईट वाटू नये म्हणून त्या गिफ्ट घेतात. 

 

7/9

जया बच्चन यांनी असंही सांगितलं की,  त्या कधीच कांजीवरमच्या साड्या नेसत नाहीत. पण त्यांनी ही साडी अभिमान या चित्रपटात नेसली होती. 

8/9

दुसरीकडे रेखा यांना कांजीवरम साडी खूप आवडते. त्या प्रत्येक कार्यक्रमात सिल्क कांजीवरम साडी नेसतात आणि त्यात त्यांचं सौंदर्य खुलून दिसतं. 

9/9

रेखाने अनेक प्रसंगी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम व्यक्त केलंय. जया बच्चन यांनी रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमाला ब्रेक लावल्यानंतर आजपर्यंत ते एकत्र कुठल्याही चित्रपटात दिसले नाहीत. 





Read More