PHOTOS

Relationship Tips : तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा, प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल

Relationship Tips : कोणाला राग येत नाही? अगदी जोडीदारावर (Partner), पती (Husband)किंवा पत्नीवर (Wife) राग येण्याचे अनेक प्रसंग घडत असतात. या रागाचे रूपांतर वादात होते आणि मग वादाचे रुपांतर भांडणात होते आणि मग नात्यात तणाव (Stress in relationship) निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण काहीवेळा राग नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करतो. जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा तुमचं प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल.. 

Advertisement
1/5
गिफ्ट द्या
 गिफ्ट द्या

जेव्हा तुमच्या जोडीदाराचा स्पेशल दिवस असतो तेव्हा तुम्ही गिफ्ट देता. तसेच तुम्ही तुमच्या जोडीदाराला खुश करण्यासाठी एखादे भेटवस्तु देऊ शकता. असे केल्याने तुमचा जोडीदार तुमच्या नाराज होणार नाही.

2/5
रुम सजवा
रुम सजवा

जर तुमच्या  जोडीदारासोबत भांडण झाले असेल तर तुम्ही घरातील खोली सजवू शकता. घर सजवण्यासाठी तुमचे फोटो फ्रेम ठेवू शकता. तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतात. 

 

3/5
रोमँटिक मेसेज पाठवा
रोमँटिक मेसेज पाठवा

तुमच्या जोडीदाराचा राग कमी करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे रोमँटिक मेसेज पाठवा ज्यामुळे तुमच्यातील मतभेद कमी होतील. जर तुमची नुकतीच भांडणे झाली असतील तर ही पद्धत तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. एक साधा रोमँटिक संदेश तुमच्या सर्व समस्या सोडवू शकतो.

4/5
लंच बॉक्समध्ये प्रेमाचे पत्र ठेवा
लंच बॉक्समध्ये प्रेमाचे पत्र ठेवा

जर सकाळपासून तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही बोलत नसाल आणि सकाळी जेवण घेताना तुमचा वाद झाला असेल तर तुम्ही एक चिठ्ठी लिहून टिफिनमध्ये ठेवू शकता आणि त्यामध्ये तुमच्या मनातील भावना लिहा. 

 

5/5
आवडते जेवण बनवा
आवडते जेवण बनवा

हृदयाकडे जाण्याचा मार्ग आपल्या पोटातून जातो असे म्हणतात. जर तुमचा जोडीदार तुमच्यावर एखाद्या गोष्टीबद्दल रागावला असेल, तर तुम्ही घरी परतल्याबरोबर त्यांच्या आवडते पदार्थ बनवू शकता आणि त्याच्यासोबत जेवण करू शकता. हा असा मार्ग आहे, ज्यामध्ये तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज भासणार नाही आणि काम फक्त घरगुती वस्तूंनीच होईल. 





Read More