PHOTOS

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती पण 1 रुपयाही पगार नाही घेत; मग मुकेश अंबानी कसा भागवतात खर्च?

Advertisement
1/9
ना पगार, ना शेअर्स विकत...मग मुकेश अंबानी कसा भागवतात खर्च? पगार न घेताही अशी होते अरबोंची कमाई
ना पगार, ना शेअर्स विकत...मग मुकेश अंबानी कसा भागवतात खर्च? पगार न घेताही अशी होते अरबोंची कमाई

Mukesh Ambani Income: रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. जगभरातील अरबपतींच्या यादीत ते 11 व्या स्थानावर आहेत. अरबांची संपत्ती असलेले मुकेश अंबानी पगार म्हणून 1 रुपयाही घेत नाहीत.

2/9
पगार शून्य रुपये
पगार शून्य रुपये

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक रिपोर्टनुसार, कोरोना काळानंतर मुकेश अंबानी यांनी पगार घेतला नाही. आर्थिक वर्षे 2020-21 मध्ये मुकेश अंबांनीचा पगार शून्य रुपये होता. ते आपले शेअर्सपण विकत नाहीत. मग त्यांचा खर्च कसा चालतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊया. 

3/9
मुकेश अंबानी नाही घेत पगार
मुकेश अंबानी नाही घेत पगार

आपण पगार घेणार नसल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी कोविड काळात केली होती. कोरोनामुळे रिलायन्सच्या उद्योगांवर परिणाम झाला. यानंतर त्यांनी पगार न घेण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या आधी 2019 पर्यंत ते 15 कोटींपर्यंत पगार घ्यायचे.

4/9
वैयक्तिक गुंतवणूक
 वैयक्तिक गुंतवणूक

आता त्यांनी पगार घेणं बंद केलं. ते स्वत:कडील शेअर्सेखील विकत नाहीत. त्यांना डिव्हिडंटच्या माध्यमातून कमाई होते. हा त्यांच्या कमाईचा मार्ग आहे. आपल्या वैयक्तिक गुंतवणुकीतून ते कमाई करतात. 

5/9
डिव्हिडंट काय असतो?
डिव्हिडंट काय असतो?

कंपनी आपल्या फायद्यातील काही भाग शेअरहोल्डर्ससोबत वाटते. ज्याला डिव्हिडंट असे म्हटले जाते. समजा रिलायन्सला 1 हजार रुपयांचा फायदा झाला तर त्यातील 500 रुपये कंपनीच्या भविष्यासाठी ठेवले जातात तर 500 रुपये शेअर होल्डर्समध्ये वाटले जातात. 

6/9
रिलायन्सचे शेअर्स
 रिलायन्सचे शेअर्स

सर्वसाधारण गुंतवणूकदारांप्रमाणे मुकेश अंबानी यांच्याकडेदेखील रिलायन्सचे शेअर्स आहेत. म्हणजेच डिव्हिडंटचे पैसे त्यांनादेखील मिळतात. या माध्यमातून ते जास्त कमाई करतात. 

7/9
अंबानींकडे रिलायन्सचे किती शेअर्स?
अंबानींकडे रिलायन्सचे किती शेअर्स?

मुकेश अंबानी आणि त्यांच्या परिवाराकडे रिलायन्स इंडस्ट्रीची 50.39 टक्के भागीदारी आहे. ज्याणध्ये मुकेश अंबानींची आई कोकिलाबेन अंबानींकडे सर्वाधिक 0.24 टक्के म्हमजे 160 लाख शेअर्स आहेत. मुकेश अंबानींकडे 0.12 टक्के म्हणजे 80 लाख शेअर्स आहेत.

8/9
80 लाख शेअर्स
80 लाख शेअर्स

नीता अंबानी, आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंतर अंबानी यांच्याकडे 0.12 टक्के म्हणजेच 80 लाख शेअर्स होते.  रिलायन्स दरवर्षी 6.30 ते 10 रुपये प्रति शेअर्स इतका डिव्हिडंट देते. या हिशोबाप्रमाणे मुकेश अंबांनींची कमाई किती होत असले याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.

9/9
आणखी कुठून येतो पैसा?
आणखी कुठून येतो पैसा?

डिव्हिडंट व्यतिरिक्त रिलायन्समध्ये अनेक प्रायव्हेट फर्मची गुंतवणूक आहे, जी मुकेश अंबानी यांचीच आहे. अंबानी परिवाराकडे व्यक्तिगत रुपात रिलायन्सची 0.84 टक्के भागीदारी आहे. याशिवाय 49.55 टक्के भागीदारी ट्रस्टकडे आहे. म्हणजेच एकूण मिळून रिलायन्सचे 50.39 टक्के शेअर्स (3 अब्ज 32 कोटी 27 लाख 48 हजार 48 शेअर्स) होतात. या हिश्श्याच्या डिव्हिडंटचा पैसा मुकेश अंबानी आणि त्यांच्या परिवाराला मिळतो. यातून मिळणाऱ्या डिव्हिडंटवरुन त्यांच्या कमाईचा अंदाज तुम्ही लावू शकता. 





Read More