प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही तरी खास करावं असा सगळ्यांचीच इच्छा असते. यादिवशी तिरंगा असलेले पदार्थ करावेत अशी अनेकांची इच्छा असते. पण वेळेचा अभाव आणि साहित्य नसल्यामुळं ती इच्छा पूर्ण होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रेसिपी सांगणार आहोत.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही तिरंगा थाळी बनवू शकता. घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तिरंगा थाळी बनवू शकता. थाळीसाठी तुम्ही किती पदार्थ बनवू शकता, जाणून घ्या.
तुम्ही तिरंगा थाळी बनवण्यासाठी तिरंगा पुरी बनवू शकता. पालकची प्युरी, बीटाची प्युरीचा वापर करुन तुम्ही तिरंगा पुरी बनवू शकता. यात अजिबात फुड कलर न वापरता तुम्ही नैसर्गिक पद्धतीने रंग आणू शकता.
थाळीत हिरव्या रंगाची भाजी म्हणून तुम्ही पालक पनीरची भाजी करु शकता.
थाळी म्हटलं की भात हा हवाच. पण साधा भात बनवण्यापेक्षा तुम्ही जीरा राईस बनवू शकतो. कुकरमध्येच तूप, मिरी आणि जिऱ्याची फोडणी देवून तुम्ही जिरा राईस बनवू शकता.
केशरी रंग म्हणून तुम्ही गाजराचा हलवा बनवू शकता. तूपात वेलची, लवंग याची फोडणी देऊन त्यात किसलेला गाजर टाका. नंतर दूध घालून गाजर चांगले शिजल्यानंतर त्यात साखर टाका.
काकडी, गाजर आणि भरपूर कोथिंबीर दह्यात घालून तुम्ही तिरंगा कोशिंबीर बनवू शकता.
गोकर्णाची फुलं वापरुन तुम्ही निळा चहादेखील बनवू शकता. यासाठी एक कप गरम पाण्यात गोकर्णाची 6-7 फुलं टाकून साखर टाका आणि चांगलं उकळवून घ्या. तुमची ब्ल्यू टी तयार