Reserve Bank of India: मागील 15 दिवसांच्या घटनाक्रमावर लक्ष घातलं असता देशातील सर्व बँकांमध्ये सर्वोच्च संस्था असणाऱ्या आरबीआयचा पवित्रा लक्षात येत आहे.
Reserve Bank of India: मागील 15 दिवसांच्या घटनाक्रमावर लक्ष घातलं असता देशातील सर्व बँकांमध्ये सर्वोच्च संस्था असणाऱ्या आरबीआयचा पवित्रा लक्षात येत आहे.
RBI कडून पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर केवायसी नियमांचं पालन करण्याबद्दल 5.39 कोटी रुपयांचा दंड लावला आहे. इथं बँकेकडून आरबीयाच्या काही नियमांचं उल्लंघन झाल्याची बाबही समोर आली आहे.
RBI च्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या तीन सहकारी बँका आणि एका एनबीएफसीवरही बँकेकडून दंड लावण्यात आला आहे. यामध्ये आण्णासाबेह मगर बँक लिमिटेड, द जबाहर अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, जनता अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड आणि फिनक्वेस्ट फायनान्शिअल सोन्यूशन्स प्रायवेट लिमिटेडचा समावेश आहे.
आरबीआयनं 9 ऑक्टोबरला एसबीपीपी सहकारी बँक लिमिटेड, किला पारदीवर 13 लाख रुपये सह्याद्री सहकारी बँक लिमिटेडवर 6 लाख रुपये, रहीमतपुर सहकारी बँकेवर 1 लाख रुपये, द गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव बँकेवर तीन लाख रुपये आणि द कल्याण जनता सहकारी बँकेवर 4.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आरबीआयनं यापूर्वी सर्वोदय सहकारी बँक, धनेरा मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँक, द जनता को-ऑपरेटिव बँक, मणिनगर को-ऑपरेटिव बँकेवरही मॉनेटरी पेनल्टी लावली आहे.
सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून सारस्वत सहकारी बँक, बेसिन कॅथलिक बँक, राजकोट नागरिक सहकारी बँकेवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. ज्यामझ्ये बेसिन कॅथलिक बँकेवर 25 लाखांचा दंड लावण्यात आला होता.
दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या बँकांमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच बँकांचा समावेश असून नाशिक जिल्हा सहकारी बँकेचा परवानाही आरबीआयनं रद्द केला आहे. एसबीआय, इंडियन बँक आणि पंजाब सिंध बँक या सार्वजनिक बँकांनाही आरबीआयनं शिक्षा ठोठावली आहे. जिथं एसबीआला 1.3 कोटी रुपयांचा दंड, इंडियन बँकेला 1.62 कोटींचा दंड सुनावण्यात आला आहे.