PHOTOS

रिटायर्टमेंटनंतर काय येतात आव्हानं? तुम्ही यासाठी सज्ज आहात का?

90 किंवा त्याहून अधिक वर्षे जगणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशी आव्हाने समजून घ्यायला हवीत.

Advertisement
1/9
रिटायर्टमेंटनंतर काय येतात आव्हानं? तुम्ही यासाठी सज्ज आहात का?
रिटायर्टमेंटनंतर काय येतात आव्हानं? तुम्ही यासाठी सज्ज आहात का?

Retirement Planning: निवृत्तीनंतरच्या चांगल्या आयुष्य जगावे असे प्रत्येकालाच वाटते. तुम्हीदेखील याचे नियोजन करत असाल तर तुम्हाला आधी येणाऱ्या संभाव्य आव्हानांबद्दल माहिती असायला हवे. त्यानंतर त्याचे नियोजन कसे करावे, याचे प्लानिंग तुमच्याकडे हवे. 

2/9
निवृत्तीनंतर कोणत्या प्रकारची आव्हाने?
निवृत्तीनंतर कोणत्या प्रकारची आव्हाने?

तारुण्यात तुम्ही कितीही पैसे कमावले किंवा वाचवले तरीही तुम्ही योग्य रिटार्यटमेंट प्लानिंग बनवले नसेल तर वृद्धापकाळात तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  निवृत्तीनंतर कोणत्या प्रकारची आव्हाने येतात हे जाणून घेऊया. जेणेकरून तुम्ही त्यानुसार नियोजन करू शकता.

3/9
आयुष्य मोठं होतंय
आयुष्य मोठं होतंय

आता लोक त्यांच्या जीवनशैलीबद्दल खूप जागरूक झाले आहेत. उपचाराच्या सुविधाही पूर्वीपेक्षा खूप चांगल्या झाल्या आहेत. अशा परिस्थितीत 90 किंवा त्याहून अधिक वर्षे जगणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

4/9
35 ते 40 वर्षांचा खर्च
 35 ते 40 वर्षांचा खर्च

भारतातील स्त्री-पुरुषांचे वय सुमारे 70 वर्षे असले तरी 100 वर्षांहून अधिक जगणाऱ्या लोकांची संख्या जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आहे. तुम्ही वयाच्या 55 किंवा 60 व्या वर्षी निवृत्त होत असाल तर पुढील 35 ते 40 वर्षांचा खर्च लक्षात घेऊन निवृत्तीचे नियोजन करावे लागेल.

5/9
अस्थिरतेचा धोका
अस्थिरतेचा धोका

कोणत्याही मार्केटमध्ये मोठ्या चढ-उतारांचा किंवा 'ब्लॅक स्वान' इव्हेंटचा धोका नेहमीच असतो. ब्लॅक स्वान म्हणजे अचानक आलेल्या वाईट घटना ज्यांचा आपल्याला अंदाज येत नाही. कोरोना महामारी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

6/9
एआय आणि हवामान
एआय आणि हवामान

कोरोना सारख्या घटना घडतात तेव्हा आर्थिक बाजारावर मोठा परिणाम होतो. याचा अर्थ गोष्टी पूर्णपणे उलट्या होतात. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि हवामान देखील भविष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात. निवृत्तीचे नियोजन करताना अशा गोष्टीही लक्षात ठेवायला हव्यात.

7/9
महागाई मोठे आव्हान
महागाई मोठे आव्हान

महागाई म्हणजे ज्या दराने वस्तूंच्या किमती वार्षिक आधारावर वाढतात. आर्थिक धोरणांनुसार ते कमी-अधिक असू शकते. भारताबद्दल बोलायचे झाले तर आता महागाई दर 5 टक्के आहे. पण, 1974 मध्ये तो 28 टक्क्यांच्या पुढे गेला होता.

8/9
महागाई वाढण्याचा हिशोब
महागाई वाढण्याचा हिशोब

याप्रमाणे महागाई वाढण्याचा हिशोब समजून घेऊया. गेल्या महिन्यात तुम्ही दैनंदिन वस्तू 1,000 रुपयांना विकत घेतल्या असाल. पण या महिन्यात महागाई वाढल्याने त्या वस्तूंचे भाव 1100 रुपयांपर्यंत वाढतात. अशावेळी तुम्ही 100 रुपये जास्त द्याल किंवा कोणतीही वस्तू कमी कराल, हे ठरवावे लागेल.

9/9
आर्थिक परिस्थितीवर परिणाम
आर्थिक परिस्थितीवर परिणाम

महागाईचा दीर्घकाळात तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे.





Read More