PHOTOS

'त्या' पेनमुळे ब्रिटनचे पंतप्रधान अडचणीत? ऋषी सुनक यांच्यासंदर्भातील नवा वाद! जाणून घ्या सविस्तर

Rishi Sunak Pens Use Issue: भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे सध्या एका वेगळ्याच वादात अडकले आहेत. हा वाद निर्माण झाला आहे ते वापर असलेल्या पेनमुळे. कार्यालयीन कामकाजामध्ये वापरल्या जाणाऱ्या या पेनच्या विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. विरोधकांनाही तर सुनक यांचं वागण हे विश्वास गमावल्याचं दर्शवतं असंही म्हटलं आहे. नेमका हा ब्रिटनमधील हा पेन वाद काय आहे जाणून घेऊयात...

Advertisement
1/12

भारतीय वंशाचे ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक हे सरकारी कामकाजासाठी वापरत असलेल्या पेनवरुन वाद निर्माण झाला आहे.

2/12

ऋषी सुनक यांच्याकडील पेनमध्ये एक विशेष प्रकारची शाई वापरली जाते, असा दावा केला जात आहे.

3/12

ही शाई पंतप्रधान ऋषी सुनक वाटेल तेव्हा पुसू शकतात, असंही सांगण्यात आलं आहे. 'द गार्डियन'ने यासंदर्भातील वृत्तांकन केलं असून गोपनीयतेच्या दृष्टीकोनातून असा पेन वापरणं फारच धोकायक असल्याचं म्हटलं आहे.

4/12

या वृत्तानुसार अनेकदा ऋषी सुनक वृत्तवाहिन्यांच्या मुलाखती आणि फोटोग्राफर्ससमोर 'पायलट-वी' पेनचा वापर करताना दिसतात.

5/12

या पेनाने लिहिलेले शब्द परत पुसता येतात, असा दावा केला जातोय. या पेनने ऋषी सुनक यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीमधील नोंदी, सरकारी कागदपत्रं, अंतरराष्ट्रीय बैठकींदरम्यानच्या करारांवरही स्वाक्षऱ्या करताना पाहिलं गेलं आहे.

6/12

पेनच्या वर अक्षर पुसून टाकण्याची क्षमता असलेला लोगो (ट्रेडमार्क) आहे. याच ट्रेडमार्कवरुन आणि पेनसंदर्भातील जाहिरातीवरुन या ऋषी सुनक वापरत असलेल्या पेनची शाई पुसली जाते असा दावा केला जातोय.

7/12

कंपनीने या पेनची जाहिरात करताना, हा पेन त्या लोकांसाठी चांगला आहे जे शाईच्या पेनाने लिहिण्याचा सराव करत आहेत. कारण चूक झाली तर ही शाई पुसता येते, असं कंपनीने जाहिरातीत म्हटलं आहे. त्यामुळेच ऋषी सुनक चर्चेत आहेत.

8/12

पंतप्रधान सुनक यांनी सरकारी कागदपत्रांवर लिहिलेल्या गोष्टी पुसता येत असतील तर ही फार गंभीर बाब असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

9/12

मात्र लंडनमधील पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या 10 डाऊन स्ट्रीटने जारी केलेल्या माहितीनुसार, या पेनचा वापर ऋषी सुनक करत नाहीत.

10/12

माध्यम सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, "अशाप्रकारच्या पेनचा वापर सामान्यपणे सिव्हील सेवेशी संबंधित लोकांकडून केला जातो. पंतप्रधान (ऋषी सुनक) या पेनचा वापर करत नाहीत," असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

11/12

खळबळ उडवून देणाऱ्या ऋषी सुनक यांच्यासंदर्भातील या पेनबद्दलच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षाचे म्हणजेच लिब्रल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते टॉम ब्रेक यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

12/12

जेव्हा राजकारणामधील विश्वास हा सर्वात खालच्या थराला असतो तेव्हा पंतप्रधानांकडून सरकारी कागदपत्रांवर अशाप्रकारच्या पेनचा वापर करण्याच्या घटना घडतात, असा टोला ब्रेक यांनी सुनक यांना लगावला आहे.





Read More