भुतलावरचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये थंडी वाढली आहे. काश्मीरमध्ये नदी, झरे वाहता वाहता आता बर्फामुळे थांबले आहेत. काश्मीर खोऱ्यात सतत बर्फे पडत आहे.
पारा शुन्याच्या खाली गेला आहे. मात्र हा नजारा सर्वाचं लक्ष वेधुन घेत आहे. सर्वाधिक थंडीचा रेकॉर्ड नोंदवला गेल्यानंतर अजूनही जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका सुरूच आहे.
गुलमर्गमध्ये पारा उणे 11.4 डिग्री सेल्सियसच्या खाली आला आहे. त्यामुळे देशभरातून आलेल्या पर्यटकांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे.
थंडीमुळे गुलमर्गमध्ये नळांचं पाणीही गोठलंय, अगदी छतावरून पडणारं पाणीही गोठलंय. बर्फाची शुभ्र चादर पांघरल्याचा भास होतो आहे.