Rohit Sharma At Siddhivinayak Temple : टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनर कॅप्टन रोहित शर्मा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी लीन झाला.
टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलमध्ये साऊथ अफ्रिकेचा पराभव करून विश्वचषकावर नाव कोरलं होतं.
अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीसह कॅप्टन रोहित शर्मा मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात पोहोचला.
कॅप्टन रोहित शर्मासोबत बीसीसीआय सचिव जय शहा यांनी देखील मंदिरात हजेरी लावली होती.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफी बाप्पाच्या चरणी ठेऊन रोहितने सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.
दरम्यान, रोहित शर्मासह जय शहा आणि बीसीसीआयचे इतर अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.