T20 विश्वचषक मध्ये सर्वाधिक मॅच खेळणारा क्रिकेटपटू म्हणजे रोहित शर्मा. त्याचबरोबर रोहितने शाकिब अल हसनसोबत 8 T20 विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत
T20 विश्वचषकमध्ये रोहित शर्मा 9व्यांदा खेळणार आहे. तर याबाबतीत धोनी आणि कोहलीने कमी स्पर्धा खेळल्या आहेत.
या स्पर्धेत रोहित शर्माची विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आयर्लंडविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात रोहितचा मोठा विक्रम करण्यावर लक्ष असण्याची शक्यता आहे.
रोहिच्या नावावर 963धावा आहेत तर ख्रिस गेलच्या नावावर 965धावा आहेत. गेलचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला ३ धावांची गरज आहे.
आतापर्यंत या यादीमध्ये विराट कोहली आणि महेला जयवर्धनेचं नाव आहे. त्यांच्या नावे अनुक्रमे 1141 तर 1061रन्स आहेत.
फलंदाजी व्यतिरीक्त रोहितच्या निशाण्यावर फील्डिंगसंदर्भात रेकॉर्ड देखील आहे. रोहितने आतापर्यंत 16कॅचेस घेतल्या आहेत. तर एबी डिविलियर्सच्या नावे हा रेकॉर्ड असून त्याने 23 झेल घेतले आहेत.
रोहित शर्माने जर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शतक ठोकलं तर तो देखील एक विक्रम असणार आहे. यापूर्वी टी-20 वर्ल्डकपमध्ये सुरेश रैनाने शतक झळकावलं आहे.