PHOTOS

सूर्या, बुमराह नव्हे तर 'या' खेळाडूच्या 'त्या' कृतीने T20 वर्ल्डकप Final जिंकलो; रोहितने सांगितलं सत्य

India T20 World Cup Win Unknown Story By Rohit Sharma: विराट कोहलीने केलेलं अर्धशतक, बुमराहची भन्नाट गोलंदाजी, हार्दिक पंड्याने टाकलेली अप्रतिम ओव्हर किंवा सूर्यकुमार यादवने सीमारेषेजवळ घेतलेल्या अप्रतिम कॅच यापैकी एकाही गोष्टीला रोहितने विजयाचं श्रेय न देता कोणत्या प्रसंगाबद्दल भाष्य केलं आहे जाणून तुम्हालाही आश्चर्यच वाटेल. विशेष म्हणजे सदर घटना विजयाला कारणीभूत कशी ठरली हे सुद्धा रोहितने सांगितलंय. तो नक्की काय म्हणालाय पाहूयात...

Advertisement
1/15

रोहित शर्माच्या या दाव्यामुळे सर्वच चाहते आश्चर्यचकित झाले असून रोहितने खुलासा केल्यावर अनेकांना या छोट्याश्या गोष्टीचा इतका परिणाम सामन्यावर झाल्याचं लक्षात आलं आहे. नेमकं रोहितने श्रेय कोणाला दिलंय पाहूयात...

2/15

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 29 जून 2024 रोजी बार्बाडोसच्या मैदानामध्ये आपला दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. या ऐतिहासिक विजयाचं भारतभरात जोरदार सेलिब्रेशन झालं.

 

3/15

मात्र धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चेंडू इतक्याच धावा हव्या असताना भारत हा सामना हारतो की काय असं वाटत होतं. मात्र सामन्याने अचानक कलाटणी घेतली.

 

4/15

सूर्यकुमार यादवने सीमारेषेजवळ घेतलेल्या अप्रतिम कॅचने आणि हार्दिक पंड्याच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताला 7 धावांनी विजय मिळवता आला असं अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे. 

 

5/15

मात्र भारताला विजय मिळवून देण्यामध्ये हार्दिक, सूर्यकुमार, बुमराहऐवजी एका वेगळ्याच व्यक्तीचा हातभार होता असा आश्चर्यचकित करणारा आणि यापूर्वी कधीही न करण्यात आलेला नवा खुलासा कर्णधार रोहित शर्माने केला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या कार्यक्रमात रोहितने हा खुलासा केला आहे.

 

6/15

रोहित शर्माने भारतीय संघाला विजय मिळून देण्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने हातभार लावल्याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे फलंदाजी किंवा फिल्डींगमध्ये नाही तर अगदीच आगळ्यावेगळ्या पद्धतीने ऋषभने दिलेलं योगदान संघाच्या कामी आल्याचा दावा रोहितने केला आहे.

7/15

ऋषभ पंतच्या एका कृतीमुळे दक्षिण आफ्रिकन संघाच्या धावगतीला ब्रेक लागला आणि त्याच क्षणी सामना फिरला असं रोहित शर्माचं म्हणणं असून नेमकं काय घडलं हे रोहितने कपील शर्माच्या शोमध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलं आहे.

 

8/15

"त्याच्याकडे बऱ्याच विकेट्स बाकी होत्या. आम्ही सर्वजण टेन्शनमध्ये होतो. मात्र कर्णधार असल्याने हे टेन्शन चेहऱ्यावर दाखवून चालणार नव्हतं. मात्र कोणालाच ठाऊक नाही की सामन्यादरम्यान एक छोटा ब्रेक झाला. (दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 24 बॉलमध्ये 26 धावा हव्या असताना.) ऋषभ पंतने डोकं वापरलं आणि सामाना थांबवला. माझा पाय दुखावला असून मला गुडघ्याला फिजिओकडून टेप लावून घ्यायची आहे असं म्हणत पंतने ब्रेक घेतला," असं रोहितने सांगितलं.

 

9/15

रोहितने सांगितलेल्या या किस्स्यासंदर्भातील पोस्ट आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यात.

10/15

पंतवरील या उपचारासाठी सामना थांबवल्याने त्याचा फायदा भारताला सामना जिंकण्यासाठी झाल्याचं रोहितचं म्हणणं आहे. दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाद फलंदाज हेन्रीक कार्लसन तुफान फलंदाजी करत असताना पंतच्या या उपचारांमुळे त्यालाही ब्रेक घ्यावा लागला आणि त्याची लय बिघडली, असं रोहितचं म्हणणं आहे.

11/15

"पटापट गोलंदाजी केली जावी असं त्यावेळी फलंदाजांना वाटत होतं कारण त्यांना लय गवसली होती. मात्र आम्हाला हा धावांचा वेग संथ करायचा होता. मी फिल्डींग लावत होतो. गोलंदाजाशी बोलत होतो आणि अचानक मी पंतला मैदानावर पडलेलं पाहिलं. तिथे फिजिओ आला आणि कार्ल्सन सामाना सुरु होण्याची वाट पाहत होता," असं रोहित म्हणाला.

12/15

"यामुळे सामना जिंकलो असं मी थेट म्हणणार नाही. मात्र हे नक्कीच कारण असू शकतं. पंतने त्याचं डोकं वापरलं," असं रोहित म्हणाला. 

13/15

रोहित कपिल शर्माच्या शोमध्ये संघ सहकारी सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, अक्सर पटेल आणि अर्शदीपसहीत सहभागी झाला होता.

14/15

विशेष म्हणजे पंतने पायाला टेप लावून घेतल्यानंतर सामना सुरु झाल्यावर पुढल्याच बॉलवर हार्दिकने कार्ल्सनला तंबूत परत धाडत त्याची आणि डेव्हिड मिलरची भागीदारी मोडीत काढली होती.

 

15/15

भारताने टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात 7 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा केल्या होत्या. यामध्ये विराटने केलेल्या दमदार अर्धशतकाचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेला 159 धावापर्यंतच मजल मारता आली. 

 





Read More