Balika Vadhu Ganga Hot Photos: मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री नंतर इतक्या बदलतात की काही विचारूच नका. त्यांचा बदलेलं रूप पाहून खरंच कोणाही बुचक्यातच पडेल, सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा आहे. जिनं बालकलाकार म्हणून आपली ओळख मिळवली होती. आता तीच अभिनेत्री मोठी झाली असून तिच्या हॉट फोटोजनी सर्वांनाच घायाळ केलंय.
'बालिका वधू' ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे तेव्हा या मालिकेची विशेष चर्चा होती. या मालिकेतील बालकलाकारही खूप मोठ्या प्रमाणात गाजले होते. त्यांची आजही लोकप्रिय कायम आहे.
या मालिकेतील गंगाची भुमिका करणारी रोशनी वालिया ही लहान मुलगी आठवते आहे का? एकेकाळी आपल्या निरागस अभिनयानं ती ओळखली जायची.
आता ती 21 वर्षांची झाली असून ती सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे त्यामुळे तिची अनेकदा चर्चा रंगलेली दिसते. यावेळी तिचे हॉट आणि बोल्ड फोटोज चांगलेच व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर ती आपले सिजलिंग फोटो टाकताना दिसते. यावेळी तिच्या काही अशाच फोटोंनी इंटरनेटवर आग लावली आहे.
तिनं 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' या मालिकेतून पदार्पण केले होते. त्यानंतर तिनं 'देवों के देव... महादेव', 'भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप' अशा मालिकांमधूनही कामं केली आहेत.
तिनं अनेक चित्रपटांतूनही कामं केली आहेत आणि सोबतच ती मध्यंतरी आर्यन खानसोबतही स्पॉट झाली होती. (All Photos: Zee News)