PHOTOS

Roti Benefits For Diabetes : 'या' पिठाच्या भाकरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी, रक्तातील साखर घेतात शोषून

Roti Benefits For Diabetes : मधुमेह रुग्ण असलेल्या रुग्णांना अनेक अन्नपदार्थाचा त्याग करावा लागतो. रक्तातील साखरेची पातळी वाढली की त्यांचा जीवाला धोका असतो. अशाच या चार पिठाच्या भाकरी या रुग्णांसाठी संजीवनी ठरतात. 

Advertisement
1/5
जवाचं पीठ
जवाचं पीठ

जवाचं पीठ म्हणजेच जव...हे पीठ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशी आहे. कारण यात फायबर, व्हिटॅमिन-सी आणि ए असं पोषक घटक आढळतात. यामुळे तुमच्या शरिरातील इन्सुलिनची पातळी सामान्य आणि नियंत्रणात राहते. याशिवाय हे पीठ खाल्ल्यामुळे तुमचं कोलेस्ट्ऱॉलची पातळीही नियंत्रित राहते. 

 

2/5
नाचणीचं पीठ
नाचणीचं पीठ

नाचणीचं पीठ हे फायबरयुक्त असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगलं मानलं जातं. नाचणीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी खाल्ल्याने तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. यामुळे तुम्ही जास्त अन्न खात नाही आणि तुमचं वजन वाढत नाही. 

3/5
ओट्सचं पीठ
ओट्सचं पीठ

ओट्समध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय, यामध्ये कमी कॅलरी असल्याने तुमचं वजन नियंत्रणात राहतं. 100 ग्रॅम ओट्समधून शरीराला 68 कॅलरीज आणि 21 ग्रॅम फायबर मिळतं.

4/5
ज्वारीचं पीठ
ज्वारीचं पीठ

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीचं पीठ हा एक चांगला पर्याय मानला जातो. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 

5/5
राजगिरा पीठ
राजगिरा पीठ

या पिठात पोषक तत्व भरपूर असल्याने मधुमेहाच्या रूग्णासाठी फायदेशीर आहे. या पिठात प्रोटीन, खनिज, व्हिटामिन, आणि लिपिडसारखी पोषक तत्व आढळतात. यामुळे साखर नियंत्रणात राहते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More