PHOTOS

'पब्लिसिटीसाठी कॅन्सरचा उपयोग', 'या' अभिनेत्रीचा हिना खानवर गंभीर आरोप, म्हणाली...

हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. अशातच पब्लिसिटी स्टंटसाठी हिना कॅन्सरचा वापर करत असल्याचा खळबळजनक आरोप रोजलिनाने केला आहे. 

Advertisement
1/7

टीव्ही क्षेत्रामधील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान गेल्या अनेक दिवसांपासून  ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. ती अनेकदा तिच्या आजारपणाबद्दल मोकळेपणाने भाष्य करते. 

2/7

इन्स्टाग्रामवर देखील अभिनेत्री हिना खानने ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भातील प्रवासाबद्दल अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच तिच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत. 

3/7

हिना खान कॅन्सरवरील उपचारांचा पब्लिसिटी स्टंट म्हणून वापर करत असल्याचा आरोप अभिनेत्री रोझलिन खानने केले आहे.

4/7

हिना खान ही तिच्या आजारपणाबद्दल अतिशयोक्ती करत असून ती होत असलेल्या उपचारांचा प्रसिद्धीसाठी वापर करत असल्याचा आरोप करत रोझलिनने हिना खानवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

5/7

रोझलिनने हिना खानच्या शस्त्रक्रियेसाठी लागलेल्या कालावधीवर प्रश्न उपस्थित केला आहे. ज्यामध्ये हिना खानने सांगितले होते की, तिची शस्त्रक्रिया 15 तास चालली. मात्र, रोझलिनच्या मते यासाठी 7-8 तास लागतात. 

6/7

एएनआयला बोलताना तिने सांगितले की, ती कोणालाही दुखावण्याचा प्रयत्न करत नाहीये. परंतु हिना खानच्या त्या विधानावर माझा आक्षेप असल्याचं तिने सांगितले. 

7/7

कारण हिना खानने सांगितले होते की, तिच्यावरील शस्त्रक्रियासाठी 7-8 तास लागणार होते पण त्यासाठी 15 तास लागले. हे माझ्यासाठी धक्कादायक होते. कारण मी देखील स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सरमधून वाचली आहे. ज्या हॉस्पिटमध्ये हिनावर शस्त्रक्रिया झाली त्याच हॉस्पिटलमध्ये माझ्यावरही शस्त्रक्रिया झालेली. सध्या हिना खान तिसऱ्या स्टेजवर आहे. 





Read More