PHOTOS

टाटांना 21881 कोटींचा फटका आणि तो ही अवघ्या 6 तासात... नेमकं घडलं तरी काय?

Ratan Tata Company Loss: देशातील सर्वात आघाडीच्या उद्योग समुहांपैकी एक म्हणजे टाटा ग्रुप ऑफ कंपनीज! विश्वासाचं दुसरं नाव अशी ओळख असलेल्या टाटा कंपनीला अवघ्या सहा तासांमध्ये हजारो कोटींचा फटका बसला आहे. नक्की घडलंय काय पाहूयात...

Advertisement
1/9

अगदी जेवणातील मिठापासून ते टीसीएसपर्यंत टेक्निकल सोल्यूशन्सपर्यंत आणि विमानांपासून ते खाणींपर्यंत व्यवसाय पसरलेला असलेल्या टाटा समुहाला अवघ्या काही तासांमध्ये हजारो कोटींचा आर्थिक फटका बसला. नक्की घडलं काय आणि कसं पाहूयात...

2/9

टाटा उद्योग समूह हा भारतामधील सर्वात आघाडीच्या उद्योग समुहांपैकी एक आहे. भारतामधील अनेक श्रेत्रांमध्ये या उद्योग समुहातील कंपन्या कार्यरत आहेत.

 

3/9

एकेकाळी रतन टाटा नेतृत्व करत असलेला हा समूह आजही त्यांच्या दर्जेदार सेवा आणि उत्पादनांसाठी ओळखला जातो.

 

4/9

मात्र बुधवारी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी याच उद्योग समुहामधील टाटा मोटर्स कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला. या कंपीनचं बाजार मूल्य बुधवारी भरपूर घसरलं.

 

5/9

टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 टक्क्यांनी घसरली. अवघ्या सव्वा सहा तासांच्या ट्रेडिंगदरम्यान म्हणजेच सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेतीनदरम्यान या कंपनीच्या बाजारमूल्यामधून 21 हजार 881 कोटी रुपये अगदी वाफेसारखे हवेत विरघळले. 

 

6/9

बुधवारी टाटा मोटर्स ही कंपनी सेन्सेक्स आणि निफ्टीवर सर्वाधिक तोटा सहन केलेली कंपनी ठरली.

 

7/9

शेअर बाजारामधील दिवसभराचं कामकाज संपलं तेव्हा या शेअरच्या किंमतीमध्ये एकूण 5.74 टक्क्यांची घसरण झाली होती. टाटा मोटर्सचा शेअर 976 रुपयांवर स्थिरावला. दिवसभरामध्ये या शेअरची सर्वाधिक घसरण 6.12 टक्के म्हणजेच प्रती शेअर 972 पर्यंत झाली होती. 

8/9

एनएसईमध्ये टाटा मोटर्स कंपनीचा शेअर 5.73 टक्क्यांनी घसरुन 976.40 पर्यंत घसरला. दिवसाअखेर कंपनीचं एकूण मूल्य 21,881 कोटी 23 लाख रुपयांनी घसरलं. दिवसाअखेरीस कंपनीचं एकूण मूल्य 3,59,227 कोटी 59 लाख इतकं होतं. 

9/9

मागील 10 दिवसांपासून सातत्याने घसरण झाल्यानंतर आज म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 0.79 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज हा शेअर कालच्या 976 रुपयांवरुन 984 वर पोहोचला आहे. 





Read More