New Rules From 1 August 2025: महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल झाल्यामुळ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. पाहा बातमी पैशांची आणि बदलेल्या नियमांची...
New Rules From 1 August 2025: नवा महिना सुरू होताच इंधनाच्या दरांपासून ते अगदी इतर महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी लागू होणारी नियमावली सतत बदलत असते. असेच काही बदल 1 ऑगस्ट 2025 पासूनही लागू झाले आहेत.
ऑगस्ट महिन्यात हवाई प्रवासापासून ते अगदी बँकच्या व्यवहारांच्या नियमावलीतही बदल झाल्यानं त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहारांवरही होऊ शकतोत. तेव्हा हे बदल नेमके कोणते आहेत हे लक्षात घ्या....
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोपेशन ऑफ इंडिया (NPCI) नं युपीआयचा वापर अधिक सुरक्षित करण्याच्या हेतूनं नवी मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅलेन्स एन्क्वायरी रिक्वेस्टची मर्यादा निर्धारित करणं आणि ऑटोपे मँडेट वॅलिडेट अॅड्रेस API त्या वापरावर नियंत्रण आणणं. ही प्रणआली अधिक स्थिर करण्यासाठी हे बदल करण्यात येत आहेत. आता एकाच युपीआयवरून एका दिवसात 50 हून अधिक वेळा बॅलेन्स तपासता येणार नाही.
बिमान कंपन्यांना पुन्हा एकदा इंधन दरवाढीला फटका बसला अलून एविएशन टर्बाईन फ्यूल (ATF) च्या दरांमध्ये 2677.88 रुपये प्रति किलोलीटर इतकी वाढ करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही वाढ करण्यात आल्यानं त्याचा थेट परिणाम विमान प्रवासभाड्यावर होणार असून विमानाची तिकीटंही महागणार आहेत. दरम्यान देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र केंद्रानं स्थिर ठेवले आहेत.
व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात 33.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही कपात झाल्यामुळं अनेक वापरकर्त्यांना किमान दिलासा मिळाला आहे. दरम्यान घरगुती वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं असणाऱ्या ज्या ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी 8 ऑगस्ट ही केवायसीची अंतिम तारीख आहे. 30 जूनपर्यंत ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी ही वाढीव मुदत देण्यात आली होती. मात्र तरीही ज्या ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांच्या बँक व्यवहारांवर यामुळं परिणाम होऊ शकतात.
ज्या ग्राहकांकडे एसबीआयचं एलीट, प्राईम किंवा कोणा खास व्हेरिएंटचं क्रेडिट कार्ड आहे तर ही बातमी त्यांना धक्का देऊ शकते. कारण, 1 ऑगस्टपासून एसबीआय (SBI) नंएअर अॅक्सिडेंट इंन्शोरन्स बेनिफिट बंद केला असून, यापूर्वी वरी कार्डवर 1 कोटींपर्यंतचा कॉम्प्लिमेंट्री विमा कवर मिळत होता. मात्र आता ही सुविधा ग्राहकांना मिळणार नाही.
पेमेंट अॅग्रीगेटर्सच्या माध्यमातून युपीआयच्या व्यवहारांवर 0.02 ते 0.04 टक्क्यांपर्यंत आयसीआयसी बँक शुल्क लागू करणार आहे. बँकेतील अॅस्क्रो खातेधारकांसाठी हे शुल्क 6 रुपये, तर इतरांसाठी 10 रुपये इतकं असेल.