Rutuja Bagwe: सध्या सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे सेलिब्रेटींनी घेतलेल्या नव्या घराची. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीची जोरात चर्चा रंगलेली आहे. तिनं यावेळी आपल्या घराविषयी भरपूर गोष्टी जाहीर केल्या आहेत.
ऋतूजा बागवे ही आपल्या सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. तिनं अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून कामं केली आहेत. त्याचसोबत तिचं 'अनन्या' हे नाटकंही प्रचंड गाजलं होतं.
ठाण्यात ऋतूजानं नवीन घरं घेतलं आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून आपल्या नव्या घराचे फोटोही पोस्ट केले आहेत. ज्याची जोरात चर्चा रंगलेली आहे.
यावेळी तिनं आपल्या या नव्या घराबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावेळी तिनं 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली आहे. त्यात तिनं मुंबईपेक्षा लांब ठाण्याला घरं का घेतलं हे सांगितलं आहे.
अनेकांचे असे स्वप्न असते की मुंबईसारख्या शहरात घर घ्यावे. परंतु महागाईही आपल्या आड येते. त्यातून काहींच्या मनात असंही असते की कधी आपल्याला शांत ठिकाणी, गाजावाजा आणि आवाज नसलेल्या ठिकाणी घरं घ्यावं. मुंबईत असं घरं मिळणं दुर्मिळच. त्यामुळे थोडं लांब घरं घेतल्याचा मग आपल्याला फायदा होतो.
सध्या आपल्या घराबद्दल ऋतूजा बागवे म्हणाली, ''माझ्या मित्र आणि मैत्रिणींचा गोतावळा ठाण्यात राहतो आणि मी प्रचंड निसर्गप्रेमी आहे. सगळ्यात आधी आईच्या सांगण्यावरून मी नवं घर शोधायला सुरूवात केली. पहिल्या दिवसापासून निसर्गाच्या सानिध्यात घर घ्यायचं हे मी ठरवलं होतं.'', असं ती म्हणाली.
ती पुढे म्हणाली की, ''कॉंक्रिटचं जंगल मला अजिबात आवडत नाही. माझा स्वभाव खूप शांत आहे त्यामुळे मला शांत ठिकाणी राहायला आवडतं. त्यामुळे बघता क्षणी ही जागा मला आवडली. माझे बरेच मित्रमैत्रिणी या भागात राहत असल्याने हा परिसर मला आधीपासून आवडायचा.''
सोबतच म्हणाली की, ''इथे याआधी सुद्धा येणं, जाणं व्हायचं. माझ्या आईबाबांच्या घराची म्हणजे परळची गच्ची मला खूप आवडते. पण या घरातून मला निसर्ग जास्त अनुभवायला मिळाला. ही जागा शांत आहे आणि सगळ्यांपासून लांब राहायला कधीकधी मला खूप आवडतं''
पुढे म्हणाली, ''आईबाबा इथे आल्यावर त्यांनाही निसर्गाच्या सानिध्यात वीकेंडचा मस्त फिल येईल. या घरात एक मोठी खिडकी आहे आणि तिकडून एक सुंदर डोंगर दिसतो. इथून पाऊस उत्तम दिसतो. वारा छान वाहतो. कधी कधी धुकं दिसतं आणि कधीतरी दूरवर ठाणे शहराची झलक पाहायला मिळते.'' आणि म्हणाली, ''घरी जे लोकं येतात त्यांची सगळ्यांची नजर पहिली खिडकीकडे जाते. त्यामुळे मी जेव्हा ही वास्तू पाहिली तेव्हाचं मला वाटलं; यही है मेरा घर''