PHOTOS

भारतातील 'या' कंपनीने 90 % कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; AI कडे सोपवला कारभार

Fires 90 % Support Staff Hires AI: कंपनीने यासंदर्भातील निर्णय घेतला असून 90 टक्के सपोर्टींग स्टाफला कामावरुन काढून टाकल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीची दिली आहे. तसेच या बदलाचा कंपनीला फायदा झाल्याचंही सीईओंनी म्हटलं आहे. ही कंपनी नेमकी कोणी आहे आणि त्यांनी नक्की काय केलं आहे जाणून घेऊयात...

Advertisement
1/10

2023 च्या सुरुवातीपासून AI चॅटबॉट्स फारच लोकप्रिय झाले आहेत. मात्र AI लोकप्रिय झाल्यापासून नोकऱ्यांवर टांगती तलावर असल्याचीही तुफान चर्चा आहे.

2/10

आता अनेक क्षेत्रांमधील नोकऱ्यांमध्ये AI मुळे कपात केली जाईल असं म्हटलं जात आहे. कंप्युटरच्या क्रांतीनंतर ज्याप्रमाणे घडलं तसाच प्रकार पुन्हा घडेल असं म्हटलं जातंय.

3/10

मात्र AI मुळे नोकऱ्या जाण्याची भीती कर्नाटकमधील 'दुकान' नावाच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सत्यात उवतरली आहे. ही कंपनी ऑनलाइन सामान विक्रीसाठी मध्यस्थी म्हणून सेवा पुरवते. म्हणजेच एखाद्या गोष्टीचं उत्पादन घेणाऱ्यांना ती विकायची असेल तर ही कंपनी अशा लोकांना ऑनलाइन स्टोअर सुरु करुन देण्याची सेवा पुरवते.

4/10

कर्मचाऱ्यांच्याऐवजी AI कामावर ठेवल्यापासून आमचा रिस्पॉन्स टाइम हा 1 मिनिटावरुन 44 सेकंदांवर आला आहे, असं कंपनीचे सीईओ सुमित शाह यांनी सांगितलं.

5/10

कस्टमर सपोर्ट हा विषय आमच्यासाठी मागील बऱ्याच काळापासून एक आव्हान ठरत होतं. यामध्ये सुधारणा करण्यासाठी बराच वाव आम्हाला होता, असं शाह यांनी सांगितलं.

6/10

शाह यांनी 'बोट 9' (Bot9) लॉन्च केलं आहे. हे बॉट्स त्यांच्या उद्योगासंदर्भातील अनेक कामं करतात. प्रामुख्याने कंपनीच्या ग्राहकांना माहिती देणं, ग्राहकांचे कॉल स्वीकारुन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवं यासारखी कामंही हे बॉट्स करतात.

7/10

'बोट 9'च्या मदतीने ग्राहकांच्या समस्यांची उत्तरं देणं, प्रोडक्ट्सबद्दल ग्राहकांना योग्य माहिती देणं अशी कामं केली जाणार आहे. पूर्वी ही काम कॉल सेंटरप्रमाणे कंपनीचे कर्मचारीच करत होते. आता ग्राहकांना थेट हे बोट्स उत्तरं देतील.

8/10

API ChatGPT चा वापर करुन हे बोट्स काम करतात. म्हणजेच ग्राहकांनी सेवांसंदर्भात संपर्क साधून प्रश्न विचारल्यावर त्याचं सविस्तर उत्तर हे देऊ शकतात. या बोट्सची किंमत 69 डॉलर प्रती महिना इतकी आहे. 

9/10

कंपनीच्या सीईओंनी हा प्लॅटफॉर्म 'मीडजर्नी'सारख्या AI प्लॅटफॉर्मप्रमाणे फार वेगाने वाढणार नाही असं म्हटलं आहे. पण असं झालं तर हाच कंपनीची पूर्णकाळ व्यवसाय म्हणून आम्ही याकडे पाहून असंही ते म्हणाले.

10/10

शाह यांनी ट्वीटरवरुन 90 टक्के सपोर्ट टीमला रिप्लेस केल्याची माहिती दिली. त्यामुळे कस्टमर सपोर्ट कॉस्ट जवळजवळ 85 टक्क्यांनी कमी झाली आहे.





Read More