अनेकदा साबुदाणा वडा तळताना लगेच फुटतो. मग अशा वेळी काय करावे? जाणून घ्या सोपी पद्धत
आषाढी एकादशी असो किंवा महिन्याची एकादशी. घरात उपवास म्हटलं की साबुदाणा वडे लगेच समोर येतात.
अनेकजण एकादशीला साबुदाणा आणि बटाट्यापासून तयार केले जाणारे उपवासाचे पदार्थ बनवतात.
परंतु, कधी-कधी एखादी चूक होते आणि साबुदाणा वडा तेलात टाकताच तो लगेच फुटतो. वडा फुटू नये यासाठी काय करावे? पाहूयात सविस्तर
जर तुमच्याकडून देखील साबुदाणा वडा तेलात तळताना फुटत असेल तर त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ किंवा उकडलेले बटाटे मिसळा.
त्यासोबतच साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे की नाही यात्री खात्री करा व जर भिजला असेल तर हे मिश्रण एकजीव करा.
यामुळे साबुदाणा वडा हा तेलात टाकल्यावर फुटणार नाही. अनेकदा साबुदाणा नीट न भिजल्यामुळे देखील तो फुटू शकतो.
त्यामुळे कमीत कमी 4-5 तास साबुदाणा भिजला पाहिजे. अनेकदा साबुदाणा आणि बटाट्याचे मिश्रण नीट न झाल्यामुळे देखील वडे फुटतात.
तसेच जर जास्त तेल गरम झाले असेल तर वडा बाहेरून तळतो. मात्र, तो आतमध्ये कच्चा राहतो. त्यामुळे तो फुटतो.